विशेष प्रतिनिधी
खेड : दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांची खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा देत पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता (क्लीन चिट) दिली आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात नाव नसणे आणि हरित लवादाने प्रकरण निकाली काढल्यामुळे अनिल परब यांची कचाट्यातून सुटका झाली आहे. Anil Parab
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावरून अनिल परब यांच्यावर सातत्याने टीका केली होती. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी बुधवारी सुनावणी पार पडली. खेड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात ही सुनावणी झाली. या प्रकरणात तत्कालीन उपविभागीय प्रांताधिकारी, महसूल अधिकारी आणि मुरुड येथील तत्कालीन सरपंच यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले होते.
भारतीय दंड विधानातील कलम 420, 120(ब), 177, 182, 290, 34 तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम 12, 13 आणि 14 अंतर्गत गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. सरकार पक्षाने मांडलेल्या भूमिकेनुसार, संबंधित रिसॉर्टची इमारत पूर्ण नसतानाही कर आकारणी करण्यात आली होती, तसेच खरेदीखतामध्ये इमारतीचा समावेश करूनही योग्य स्टॅम्प शुल्क न भरता शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप होता.
याशिवाय, सीआरझेड प्रतिबंधित क्षेत्रात बांधकाम केल्याचे, अकृषी परवानगीसाठी बनावट सह्या केल्याचे आणि विजेचा मीटर मिळवण्यासाठी खोट्या कागदपत्रांचा वापर केल्याचेही आरोप करण्यात आले होते. या सर्व आरोपांमुळे हे प्रकरण केवळ कायदेशीरच नव्हे तर राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचे आणि सर्वांच्याच चर्चेता विषय बनले होते. परंतु, या प्रकरणी बचाव पक्षाचे वकील सुधीर शरद बुटाला यांनी न्यायालयात प्रभावीपणे युक्तिवाद केला. “जमीन आणि बांधकाम हे स्वतंत्र घटक आहेत आणि त्याबाबतचा कायदा वेगळा आहे,” असा महत्त्वाचा मुद्दा बचाव पक्षाच्या वकिलांनी मांडला. त्यामुळेच न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
Anil Parab acquitted in controversial Sai Resort case due to lack of evidence
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा