“शेजारच्या महिलेने अफवा पसरवली”; पर्वती अत्याचार प्रकरणातील आरोपीचा कोर्टात दावा…

विशेष प्रतिनिधी

पुणे: जिल्ह्यातील नसरापूर येथील अत्याचाराची घटना ताजी असतानाच,मंगळवारी शहरातील पर्वती येथे पुन्हा लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली.६५ वर्षांच्या आजोबाने आपल्याच नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणानंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे.सदरील प्रकरणातील आरोपीला काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं.त्यावेळी आरोपीने कोर्टात सांगितले की, ‘ मी घरात माझ्या नातीसोबत बसलेलो होतो,त्या बाईने माझ्याविषयी चुकीची अफवा पसरवली ‘ असे स्पष्ट केले.

कोर्टात काय घडलं?

पर्वती अत्याचार प्रकरणातील आरोपीला ६ मे रोजी कोर्टात हजर करण्यात आले होते.मात्र आरोपीला जाब विचारण्यात आल्यानंतर आरोपीने सांगितले की, ‘ मी फक्त माझ्या नातीसोबत बसलो होतो, शेजारच्या बाईने माझ्याविषयी चुकीची अफवा पसरवली ‘ असे स्पष्टीकरण दिले.

दरम्यान, आरोपीच्या छातीवर मुलीच्या नखांचे ओरखडे आणि ओठांवर चावा घेतल्याचे व्रण उमटल्याचे माहिती समोर आली आहे.आरोपीची बलात्काराच्या गुन्ह्याचा संबंधाने वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.पुणे न्यायालयाकडून आरोपीला ८ मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.



पीडितेच्या आईची फाशीची मागणी..

पीडित मुलीचे आईवडील हे रोजंदारीचे काम करतात. आई कपड्यांचा दुकानावर काम करते,तर वडील हे रिक्षाचालक आहेत.” माझ्या स्वतःच्या वडिलांनी माझ्या मुलीवर अत्याचार केला.माझ्या वडिलांना फाशी झाली पाहिजे”. अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या आईने दिली आहे.

“The woman next door spread the rumor”; Accused in Parvati rape case claims in court…

महत्वाच्या बातम्या