विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिकमधील टीसीएस कंपनीशी संबंधित कथित लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्याकडेच कथित मिशन कन्व्हर्जनची जबाबदारी सोपवण्यात आल्याचा संशय विशेष तपास पथकाने व्यक्त केला आहे. सध्या निदा खान फरार असून तिचा शोध घेण्यासाठी राज्यभर विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत.
मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये निदा खान हिचे नाव समोर आले आहे. तपासादरम्यान टीसीएसमधील एका पुरुष कर्मचाऱ्यासह महिला कर्मचाऱ्याचे धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच धार्मिक भावना दुखावणे, गुंगी आणणारे पदार्थ वापरून अत्याचार करणे आणि पीडितांना धमकावणे असे गंभीर आरोपही या प्रकरणात करण्यात आले आहेत. एसआयटीच्या हाती लागलेल्या काही पुराव्यांनुसार निदा खान ही केवळ सहभागी नव्हती, तर काही विशिष्ट व्यक्तींना लक्ष्य करण्याचे काम तिच्याकडे देण्यात आले होते, असा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी निदा खानने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप आणि प्राथमिक पुरावे लक्षात घेऊन तिचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर ती फरार झाली असून पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली आहेत. नाशिक पोलिसांकडून विविध जिल्ह्यांमध्ये तपास सुरू असून तिच्या संपर्कातील लोकांचीही चौकशी केली जात आहे. तपास यंत्रणांच्या मते, निदा खानला अटक झाल्यानंतर या प्रकरणातील आणखी अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाची सुरुवात 2 एप्रिल रोजी झाली होती. टीसीएसमधील एका पुरुष कर्मचाऱ्याने मुंबई नाका पालिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करत तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन या चौघांना अटक केली. सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या चौकशीतून काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे आणि संभाषणांचे तपशील समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तपास अधिक खोलात जात असताना या प्रकरणाचे धागेदोरे राज्याबाहेर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील जाळ्याशी जोडलेले असण्याची शक्यता तपासली जात आहे.
Nida Khan was responsible for the alleged mission conversion.
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा