विशेष प्रतिनिधी
पुणे: शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी शहरात ५६ किलोमीटरचे भुयारी मार्ग केले जाणार आहेत.शहरात विविध ठिकाणी ५ बोगदे तयार केले जाणार आहेत.महापालिकेकडून ‘ स्पेशल पर्पज व्हेईकल ‘ कंपनी देखील स्थापन करण्यात येणार आहे.महापालिकेकडून प्राथमिक अहवाल ८ दिवसात सरकारला सादर देखील केला जाणार आहे.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून भूमिगत रस्ते तयार करण्याची घोषणा करण्यात आली होती.याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा मुंबईत अर्थसंकल्प सादर करण्यात आला.या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून भुयारी रस्ते तयार करण्यासाठी ‘ एसपीव्ही ‘ स्थापन करण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेण्याच्या आदेश दिले आहेत.
शहरात कुठे होणार भुयारी मार्ग?
येरवड्यातील शास्त्रीनगर ते कोंढवा येथील खडीमशीन चौक, सिंहगड रस्त्यावरील पु. ल देशपांडे उद्यान ते औंध मार्गे जगताप डेअरी चौक, खडकी ते शास्त्रीनगर चौक, सिंहगड रोडवरील पु.ल देशपांडे उद्यान ते शंकर शेठ रोडवरील सेव्हन लव्हज् आणि बाणेर पाषाण ह्या महत्वाच्या रस्त्यावर भुयारी मार्गांचे जाळे विस्तारले जाणार आहे.
दरम्यान, 34000 करोड रुपयांच्या या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागार नेमला जाणार आहे. प्रकल्प मोठा आणि विस्तीर्ण असल्यामुळे ‘ पीपीपी ‘ तत्त्वावर राबवण्याचा विचार सरकारकडून करण्यात येतोय.’ पीएमआरडीए” च्या प्राथमिक आराखड्यानंतर महापालिकेकडून पुढील अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Fadnavis’ announcement will be implemented in Pune; subways to be built at four places…
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा