Asaduddin Owaisi : निदा खान आणि मतीन पटेल न्यायालयात निर्दोषत्व सिद्ध करतील, असदुद्दीन ओवेसी यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Asaduddin Owaisi नाशिक येथे दाखल लैंगिक छळ आणि धर्मांतरास प्रोत्साहन दिल्याच्या गुन्ह्यातील आरोपी निदा खान हिला लपून राहण्यासाठी मदत केल्याप्रकरणी सहआरोपी करण्यात आलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल न्यायालयात स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करतील, असा विश्वास एमआयएमचे प्रमुख बॅ. असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.Asaduddin Owaisi

“एखाद्यावर गुन्हा दाखल झाला म्हणजे तो दोषी ठरत नाही. अनेक आमदार आणि खासदारांवरही विविध गुन्हे दाखल असतात, म्हणजे ते सर्व दोषी ठरतात का?” असा सवाल करत ओवेसी यांनी माध्यमांमधून आरोपींना आधीच दोषी ठरवले जात असल्याची टीका केली.Asaduddin Owaisi



 

निदा खान प्रकरणात केवळ तिच्या घरी बुरखा आणि धार्मिक पुस्तके आढळल्याच्या आधारावर आरोप करण्यात येत असल्याचा दावा ओवेसी यांनी केला. “बुरखा हा कधी बेकायदेशीर ठरला? मुस्लिमांच्या घरात धार्मिक पुस्तके असणारच. या प्रकरणात न्यायालयात सत्य समोर येईल,” असे ते म्हणाले.

नाशिक पोलिसांनी निदा खानला नारेगाव परिसरातून अटक केल्यानंतर तिला लपवून ठेवल्याच्या आरोपावरून नगरसेवक मतीन पटेल यांना सहआरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणावरून शिवसेना शिंदे गट आणि एमआयएममध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. धर्मांतरास प्रोत्साहन देणाऱ्या आरोपींना एमआयएमकडून मदत केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला असून, याबाबतचे निवेदन पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी “मतीन पटेल न्यायालयात स्वतःची बाजू मांडतील आणि कायदेशीर लढा देतील,” असे स्पष्ट केले. तसेच “या प्रकरणाशी एमआयएमचा संबंध जोडण्याचा प्रयत्न होत आहे. आता निदान आम्हाला ‘ब’ टीम म्हणत नाहीत, हेही कमी नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, पत्रकार परिषदेत ओवेसी यांनी ‘वंदे मातरम’ विषयावरही भाष्य केले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, ‘वंदे मातरम’मधील दुर्गेच्या प्रतिमेमुळे मुस्लिम समाज हे गीत स्वीकारणार नाही, असे मत टागोर यांनी व्यक्त केले होते. “त्या मताशी आम्ही सहमत आहोत. त्यामुळेच संसदेतही मी ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीत करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता,” असे ओवेसी यांनी सांगितले.

तसेच ‘आनंद मठ’ या पुस्तकामध्ये मुस्लिमविरोधी उल्लेख असल्याचाही दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

Asaduddin Owaisi says Nida Khan and Matin Patel will prove innocence in court

महत्वाच्या बातम्या