कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ने आपल्या काही दुग्धजन्य उत्पादनांसाठी घेतलेल्या ‘हलाल प्रमाणपत्रा’वरून जिल्ह्यात नवा वाद निर्माण झाला आहे. आगामी गोकुळ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर निशाणा साधला आहे. दुग्धजन्य पदार्थांसाठी हलाल प्रमाणपत्राची गरज काय, असा सवाल उपस्थित करत विरोधी गटाने गोकुळ प्रशासनावर टीका केली आहे.
सोशल मीडियावरही या विषयाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी याविरोधात भूमिका मांडली आहे. त्यामुळे हा मुद्दा आता राजकीय रंग घेत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘गोकुळ’ प्रशासनाने अधिकृत परिपत्रक जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रमाणपत्र कोणत्याही धार्मिक प्रचाराशी संबंधित नसून पूर्णपणे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि निर्यातीच्या दृष्टीने आवश्यक असलेले गुणवत्ता मानक (स्टँडर्ड) आहे.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, ‘ हा निर्णय नवीन नसून 2022 पासून हे प्रमाणपत्र अस्तित्वात आहे. सध्या गोकुळच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे, ज्यांच्याकडे काही काम नाही ते विरोधक मुद्दाम जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी हा जुना विषय उकरून काढत आहेत ‘. या विषयाकडे धार्मिक नाहीतर व्यवसायिक आणि दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
हलाल म्हणजे काय?
‘हलाल’ हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ इस्लाम धर्मानुसार वैध, मान्य किंवा परवानगी असलेली गोष्ट असा होतो. इस्लाममध्ये ‘हलाल’ आणि ‘हराम’ या दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. हलाल म्हणजे धर्माने स्वीकारलेल्या गोष्टी, तर हराम म्हणजे इस्लामनुसार निषिद्ध किंवा अमान्य गोष्टी. या संकल्पना केवळ खाण्या-पिण्यापुरत्या मर्यादित नसून संपूर्ण जीवनशैलीशी जोडलेल्या आहेत. कोणते अन्न योग्य किंवा अयोग्य, यासोबतच वर्तन, व्यवहार, प्रामाणिकपणा, व्यसनांपासून दूर राहणे, दानधर्म, दैनंदिन आचार-विचार आणि सामाजिक मूल्ये यांचाही हलाल-हरामच्या चौकटीत विचार केला जातो. त्यामुळे हलाल ही संकल्पना इस्लाममध्ये केवळ आहाराशी संबंधित नसून नैतिक आणि धार्मिक जीवनपद्धतीचा एक भाग मानली जाते.
Name dispute over Gokul’s ‘halal certificate’; Politics heats up before elections
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश