Sanjay Raut : अपना सपना मनी…मनी. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा ऍडव्हान्स, संजय राऊत यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sanjay Raut अपना सपना मनी…मनी. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा ऍडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.Sanjay Raut

शिवसेना पक्षात 20 जून रोजी इतिहासातील सर्वात मोठी फूट पडली होती. याच दिवशी विधान परिषदेच्या मतदानानंतर 20 जून 2022 रोजी शिवसेनेच्या 25 आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होऊन पहिल्यांदा सूरतला रवाना झाले होते. त्यानंतर 22 जून रोजी ते गुवाहाटीला रवाना गेले होते. गुवाहाटीहून मुंबई व्हाया गोवा परतल्यानंतर थेट भाजपच्या पाठिंब्यावर ते अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले होते. आता चार वर्षांनंतर अशीच परिस्थिती पुन्हा उद्भवली आहे. तोच महिना आणि जवळपास तीच तारीख काही संकेत देत आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रासह देशभरात ऑपरेशन टायगरची चर्चा होताना दिसत आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पोस्ट चर्चेत आली आहे.Sanjay Raut



गेल्या आठवड्याभरापासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी 14 जून रोजी ‘मातोश्री’वर सर्व 9 खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला केवळ 4 खासदार उपस्थित राहिले, तर पाच खासदार ऑनलाइन उपस्थित होते. या सर्व खासदारांनी आई भवानी, साईबाबांची शपथ घेत ठाकरेंसोबत असल्याचे स्पष्ट केले, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी ठाकरेंचे पाच खासदार शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू झाल्याने संजय राऊत तातडीने सोमवारी (15 जून) दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर आज (16 जून) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेचे खासदार दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा 60 वा वर्धापनदिन 19 जून रोजी आहे. 1966 मध्ये शिवसेनेची स्थापन झाली. तेव्हापासून पक्षातून अनेक नेते बाहेर पडले, काहींची हकालपट्टी देखील झाली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी तब्बल 41 आमदार फोडून उद्धव ठाकरेंना धक्का दिलाच शिवाय भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रीही झाले. हा धक्का शिवसेनेला नवा आणि जबरदस्त होता. आता हे कमी म्हणून की काय काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा असून या ऑपरेशनची तारीख 19 किंवा 20 जून असू शकते, याकडे लक्ष वेधले जात आहे. यात ठाकरेच्या पक्षाचे खासदार गळाला लागल्याचे वारंवार सांगितले जात आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचा 60 वा वर्धापनदिन षण्मुखानंद सभागृहात तर शिंदेंच्या शिवसेनेचा 60 वा वर्धापनदिन गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये साजरा होणार आहे. ऑपरेशन टायगरसाठी वर्धापनदिनाचा मुहूर्त काढल्याची चर्चा आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने एकनाथ शिंदें यांना विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही न बोलता शिंदे पुढे गेले. दरम्यान, वर्धापनदिनानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 20 जून रोजी ठाकरेंच्या आमदारांची बैठक शिवालयात होणार आहे. ही बैठक पावसाळी अधिवेशनासाठी होणार आहे, असे सांगितले जात आहे. मात्र, दगाफटका टाळण्याचे उद्धव ठाकरेंचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

15 Crore Advance Offered to Buy Maharashtra MPs Tonight’: Sanjay Raut Alleges Poaching Bid

महत्वाच्या बातम्या