विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jayant Patil राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर योजनेमुळे ग्राहकांना वाढीव वीजबिले आणि थकीत दंडाचा सामना करावा लागत आहे. राज्यातील जनतेची होत असलेली आर्थिक लूट थांबविण्यासाठी स्मार्ट मीटर योजनेला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आज (15 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे. ग्राहकांना आलेल्या वाढीव बिलांची चौकशी करावी तसेच अन्यायकारक दंड तत्काळ रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.Jayant Patil
महावितरणमार्फत राज्यभरात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिक, घरगुती ग्राहक आणि व्यापारी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून त्यांचे स्मार्ट मीटरच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे.Jayant Patil
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वीजबिले येत आहेत. याशिवाय मंजूर वीजभारापेक्षा अधिक वापर झाल्याचा दावा करून ग्राहकांवर मागील कालावधीचा दंड लादला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप आणि संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी जुन्या मीटरमध्ये तांत्रिक त्रुटी किंवा संथ नोंदणीची समस्या असताना त्याची जबाबदारी ग्राहकांवर टाकली जात असून वीज वितरण यंत्रणेतील त्रुटींचा आर्थिक बोजा ग्राहकांवर टाकणे अन्यायकारक असल्याचे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
स्मार्ट मीटर प्रकल्पाला तातडीने स्थगिती देऊन आतापर्यंत आकारण्यात आलेल्या वाढीव बिलांची आणि अतिरिक्त भाराच्या दंडाची स्वतंत्र चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत दंड आकारणी थांबवावी आणि कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे. गोवा सरकारने स्मार्ट मीटर संदर्भातील तक्रारींची दखल घेत या मोहिमेला तात्पुरती स्थगिती देत वाढीव बिलांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारनेही त्याच धर्तीवर निर्णय घेण्याची गरज असल्याचे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
Jayant Patil Demands Suspension of Smart Meter Scheme
महत्वाच्या बातम्या