विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गटामागचे शुक्लकाष्ट संपायला तयार नाही. सहा खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यावर आता आमदारांवर भराेसा राहिला नाही अशी वेळ आली आहे. त्यातच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे टेन्शन वाढले आाहे.
माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झाले आहे. थोडं थांबा, १४ पेक्षा जास्त आमदार आमच्यासोबत येतील. एकनाथ शिंदे काही बोलत नाहीत, ते फक्त दाढीवर हात फिरवतात. हे स्वतः आदित्य ठाकरे यांनीही म्हटले आहे. जेव्हा शिंदे दाढीवर हात फिरवतात, तेव्हा ऑपरेशन टायगर यशस्वी होते.”
फुटलेल्या ६ खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे उद्यापासून तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यावर टाेला लगावताना पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात फिरलेच पाहिजे; मुलाने (आदित्य ठाकरेंनी) काम केले नाही, तर बापाने ते केलेच पाहिजे.”
दुसऱ्या बाजुला सार्वजिनक आरोग्यमंत्री प्रकाश प्रकाश आबिटकर यांनीही याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गतिमान कार्यावर राज्यभरातील लोकप्रतिनिधींचा मोठा विश्वास आहे. त्यामुळेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेकडे आमदार आणि खासदारांचा ओढा सातत्याने वाढताना दिसतोय. येणाऱ्या काही दिवसांत राज्यातील अनेक मोठे लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
पत्रकारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी वादात सापडलेले खासदार संजय दिना पाटील यांना गुलाबराव पाटलांनी जाहीर सल्ला दिला आहे. “पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आणि आपला आरसा आहे, आरशाला दगड मारू नये. राजकारणात वाद होत असतात, पण मारामारी किंवा शिवीगाळ करणे चुकीचे आहे. संजय दिना पाटील यांनी या प्रकरणी ‘सॉरी’ म्हणायला काहीच हरकत नाही
Gulabrao Patil’s Claim Sparks Fresh Trouble for Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- संजय दिना पाटलांची पत्रकारांना दमबाजी; फडणवीसांची तीव्र नाराजी; आता शक्यता कारवाईची!!
- मोदी सरकारने बरोबर नस दाबली; FCRA कायद्यातली दुरुस्ती धर्मांतराचे उद्योग करणाऱ्या चर्चला खटकली!!
- नसरापूरचा नराधम भीमराव कांबळे दोषी; पण जन्मठेप की फाशी, न्यायालयाने निकाल ठेवला राखून!!
- महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला स्वतः शरद पवार गैरहजर; पण म्हणाले, आमचे खासदार नाही फुटणार!!