विशेष प्रतिनिधी
मुंबई : मालाडमधील जैन समाजाच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेऊन मराठीत लेखी माफीनामा साेपवत दिलगिरी व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शिष्टमंडळाने राज ठाकरे यांच्याकडे मराठी भाषेत लेखी माफीनामा सोपवत दिलगिरी व्यक्त केली.
जैन समाजाच्या प्रतिनिधींनी घडलेल्या घटनेबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली असून, कोणत्याही समाजाच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले. या पत्रात जैन समाजाने म्हटले की, 17 जून 2026 रोजी शिवाजी चाैक, प्लाझा सेंटरजवळ दफ्तरी रोड येथे असलेल्या शिवाजी महाराज यांच्या जिरे टोपा पुतळ्यावर काही समाजकंटक व्यक्तींकडून जैन समाजाचा ध्वज लावण्यात आला. या घटनेमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या, याची आम्हाला जाणीव आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून जिरे टोपा हा स्वाभिमान, शाैर्य आणि मराठी अस्मितेचे प्रतिक आहे. अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रतिकाचा योग्य सन्मान राखला पाहिजे, याबाबत आम्ही सहमत आहोत. या प्रकरणी मनसेचे विभाग अध्यक्ष महेश मनोहर फरकसे यांच्या आंदोलनानंतर ध्वज तात्काळ हटवून माफी मागून आमची चूक मान्य केली.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर, गिरगाव आणि इतर भागांतील सोसायट्यांमध्ये जैन धर्मगुरूंच्या आगमनासाठी रस्त्यांवर आणि सोसायटीच्या आवारात पांढरे पट्टे मारण्याचा ‘ट्रेंड’ सुरू झाला आहे. यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी जैन समाजाला सुनावले की, “गेल्या १०-१२ वर्षांतच असे वाद कसे सुरू झाले? याआधी तुमचे धर्मगुरू सोसायट्यांमध्ये यायचे नाहीत का? तेव्हा असे पांढरे पट्टे मारले जात नव्हते. तुमचे धर्मगुरू येणार असतील तर तुम्ही कार्पेट किंवा कापड टाका आणि ते गेल्यावर ते काढून घ्या. पण असे पांढरे पट्टे कसले मारता?”.
तुमची माथी भडकवली जात आहेत. तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्या अंगावर येऊ नका. तुम्हाला काय वाटतं, वर दोन गुजराती बसले आहेत तर तुम्ही काहीही करू शकता का?” असा सवाल त्यांनी केला.
तुम्ही व्यापारी लोक आहात, व्यापार करा आणि शांत जगा. तुम्ही पांढरे पट्टे मारून विनाकारण वाद निर्माण करत आहात. जर तुम्ही अति करत असाल आणि आमची डोकी भडकली, तर केवढं होईल याचा विचार करा,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
Raj Thackeray receives apology letter as Jain community delegation expresses regret
महत्वाच्या बातम्या
- संजय दिना पाटलांची पत्रकारांना दमबाजी; फडणवीसांची तीव्र नाराजी; आता शक्यता कारवाईची!!
- मोदी सरकारने बरोबर नस दाबली; FCRA कायद्यातली दुरुस्ती धर्मांतराचे उद्योग करणाऱ्या चर्चला खटकली!!
- नसरापूरचा नराधम भीमराव कांबळे दोषी; पण जन्मठेप की फाशी, न्यायालयाने निकाल ठेवला राखून!!
- महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला स्वतः शरद पवार गैरहजर; पण म्हणाले, आमचे खासदार नाही फुटणार!!