विशेष प्रतिनिधी
मुंबई : Supriya suleसिंचन घोटाळ्यासंदर्भात अजित पवारांची चौकशी करायच्या फाईलवर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा पाटलांनी सही केली. त्यानंतर सरकार बदलले. ती फाईल मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे आली. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना ती फाईल दाखवून तुमच्याच उपमुख्यमंत्र्याने चौकशी करावी, अशी सही केल्याचे त्यांना दाखविले. यावरून शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे भडकल्या. त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप केला, पण फडणवीसांनी सुप्रिया सुळे यांना प्रशासनातले काही कळत नाही, असे सांगून पलटवार केला.Supriya sule
70000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावर शरद पवारांचे राष्ट्रवादी अडचणीत सापडली होती. त्यांच्या पक्षाला दोनदा विधानसभेत पराभव स्वीकारावा लागला होता. अजितदादांसह अनेक मंत्री त्यात अडकले होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीसाठी नाजूक जागेचे दुखणे झाले.Supriya sule
सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर आर. आर. आबा पाटलांनीच सही केली होती. नंतर ती फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली. त्यांनी अजितदादांना बोलवून ती फाईल आणि आर. आर. आबांची सही दाखवली म्हणून सुप्रिया सुळे भडकल्या. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना गोपनीयतेची पण शपथ घेतली होती. अजितदादांना ती फाईल दाखवून फडणवीसांनी गोपनीयतेचा भंग केला म्हणून निवडणुकीनंतर कोर्टात खेचण्याची भाषा सुप्रिया सुळे यांनी वापरली.
मात्र, फडणवीस यांनी सुप्रिया सुळेंच्या प्रशासकीय ज्ञानाची पोलखोल केली. सुप्रिया सुळेच्या ज्या फाईल बद्दल बोलताहेत, ती फाईल “पब्लिक डॉक्युमेंट” आहे. माहितीच्या अधिकारात ती फाईल कुणालाही मिळू शकते. सुप्रिया सुळे यांना प्रशासनातले काही कळत नाही, अशा शब्दांमध्ये शरद पवारांच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांचे फडणवीस यांनी जाहीर वाभाडे काढले. त्यामुळे आता “पब्लिक डॉक्युमेंट” असलेल्या फाईलबाबत निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे या देवेंद्र फडणवीस यांना कोर्टात खेचणार की नाही??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Supriya sule has no knowledge of administration, says fadnavis
महत्वाच्या बातम्या
Trump’s : विजयानंतर ट्रम्प यांचा पुतीन यांच्याशी पहिला संवाद, युक्रेनमधील युद्ध न वाढवण्याचे आवाहन