Wadgaon Sheri वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का, रेखा टिंगरे यांचा शरद पवार गटात प्रवेश

Wadgaon Sheri वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का, रेखा टिंगरे यांचा शरद पवार गटात प्रवेश

Wadgaon Sheri Rekha Tingre

विशेष प्रतिनिधी

वडगाव शेरी  : वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना विजयी करण्यामध्ये आमचे मोलाचे योगदान राहिल असा शब्द त्यांनी. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिला आहे.

शरदराव पवार यांचे उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रवेश केला. वडगाव शेरी येथील माजी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीपआबा तुपे, सन्मित्र सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अनिल तुपे, धनकवडी परिसरातील समीर धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. तेथील उमेदवारांना विजयी करण्यामध्ये आमचं मोलाचं योगदान राहिल, असा शरद पवार यांना शब्द दिला.

रेखा टिंगरे या वडगाव शेरी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र शरद पवार आणि वडगाव शेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असल्याचे सांगितले.

रेखा टिंगरे या 2007 मध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून काँग्रेसच्या तिकिटावर महापालिकेत निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2012 आणि 2017 मध्ये त्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या भावकीतील आहेत.

Wadgaon Sheri Rekha Tingre sharad pawar group entry

महत्वाच्या बातम्या

Trump’s : विजयानंतर ट्रम्प यांचा पुतीन यांच्याशी पहिला संवाद, युक्रेनमधील युद्ध न वाढवण्याचे आवाहन

Jaishankar : जयशंकर म्हणाले- ट्रम्प यांच्या विजयामुळे भारत चिंतित नाही, ओबामा-बायडेन आणि डोनाल्ड यांच्याशी मोदींचे वैयक्तिक संबंध

Kerala Governor : केरळचे राज्यपाल म्हणाले- ‘बटोगे तो कटोगे’ मध्ये काही चुकीचे नाही, जेव्हा आस्था समान असते तेव्हा आपण सर्वांनी एकत्र यायला हवे

Sanjeev Khanna : न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे 51वे सरन्यायाधीश बनले, सहा महिन्यांच्या कार्यकाळात 5 मोठ्या खटल्यांची सुनावणी होणार

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023