नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणाने आज खऱ्या अर्थाने कूस बदलली. काँग्रेसी राजकारणातून महाराष्ट्र मुक्त झाला. इतकेच काय, पण पवार आणि ठाकरे या दोघांचेही घराणेशाही वर्चस्व महाराष्ट्रातल्या मतदारांनी संपुष्टात आणले. मग भले बाळासाहेबांचे नातू आणि पवारांचे एक नातू जिंकले असतील, पण ते बसणार मात्र तोकड्या विरोधी बाकांवरच!! BJP has become old Congress like people movement
1972 नंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या जनतेने एवढा प्रचंड निर्णायक कौल दिला. 1972 मध्ये यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने 202 जागा मिळवल्या होत्या. मित्र पक्षांचा 222 जागांवर विजय मिळवून काँग्रेस सत्तारूढ झाली होती. त्यानंतरच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये काँग्रेस किंवा बाकीच्या कुठल्याही पक्षाने डबल सेंचुरी मारली नव्हती. काँग्रेसने डबल सेंचुरी मारण्याचे 1972 हे अखेरचे वर्ष होते. त्यानंतर तब्बल 52 वर्षांनी भाजप महायुतीने 231 जागांवर विजय मिळवला आहे. यात भाजपचा वाटा तब्बल 131 जागांचा असून शिंदे सेना 57 आणि अजित पवार राष्ट्रवादी यांचा 41 जागांचा वाटा आहे.
यामध्ये भाजपने काँग्रेस सारखे डबल सेंचुरी मारली नाही हे खरे, पण भाजपने ज्या प्रकारे महायुतीतल्या दोन घटक पक्षांना सामावून घेऊन नेतृत्व केले, त्यातून भाजपच्याच मतांचा फायदा शिंदे सेना आणि अजितदादांना झाला आणि ते अनुक्रमे 57 आणि 41 जागांवर पोहोचू शकले. या सगळ्यांमध्ये भाजपने महाराष्ट्रातल्या सर्व 288 मतदारसंघांमध्ये काम केले. त्यासाठी संघ परिवारातल्या 65 संघटना मैदानात उतरल्या त्यांनी मतदारयाद्या अपडेट करण्यापासून संपर्कांपर्यंत मायक्रो लेव्हलवर काम केले. काँग्रेस एकेकाळी सर्वव्यापी पक्ष होता. छोट्या गावातल्या वाड्या वस्त्यांपासून ते मुंबई सारख्या महानगरापर्यंत सगळीकडे काँग्रेस कार्यकर्ता वर पासून खालपर्यंत पसरला होता. महाराष्ट्रात एकही गाव असे नव्हते, की जिथे काँग्रेस कार्यकर्ता नसेल. काँग्रेस एक सामाजिक आणि राजकीय लोक चळवळ होती. तिचे राजकीय पक्षात रूपांतर झाल्यानंतर त्या संघटनेचे यश प्रचंड ठरले होते.
त्याउलट शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रातील विखुरलेल्या स्वरूपात काही पॉकेट्स मध्ये अस्तित्वात होता. शेवटी शेवटी तर यशवंतराव चव्हाणांनी शेतकरी कामगार पक्ष अक्षरशः गुंडाळून काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला होता. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना लाभार्थी पदे देऊन यशवंतरावांनी शेतकरी कामगार नावाची चळवळ संपवली होती.
आज त्या अर्थाने भाजपची “जुनी काँग्रेस” झाली आहे. कारण भाजप देखील आता कुठल्या शेठजी भटजींचा पक्ष राहिला नसून महाराष्ट्रातल्या गावागावांमधल्या वाड्या वस्त्यांपासून ते थेट महानगरांपर्यंत संघटनेचे जाळे पसरलेला पक्ष बनला आहे. तो टप्प्याटप्प्याने लोक चळवळीत देखील रूपांतरित होतो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यात कॅटलिस्टची भूमिका बजावली आहे. संघाच्या 65 संस्थांनी निवडणुकीत ग्राउंड लेव्हलवर केलेले काम देखील साक्ष देते.
त्या उलट पवार आणि काँग्रेस “जुने शेकाप” बनले आहेत. कारण आता त्यांचे राजकीय अस्तित्व महाराष्ट्रातल्या किरकोळ आणि छोट्या पॉकेट्स मध्ये मर्यादित होऊन शिल्लक राहिले आहे. तशीही काँग्रेस पक्ष ही लोक चळवळ होती, पण पवारांचा पक्ष कधीच लोक चळवळ नव्हता. उलट तो क्षेत्रीय सरदार – दरकदारांचा समूह होता. आता तो समूह देखील आकुंचन पावला आहे. पवार आता फक्त 10 आमदारांचे नेते उरले आहेत. चारच महिन्यांपूर्वी पवार 8 खासदारांचे नेते होते. आता तो दिमाख संपुष्टात येऊन ते 10 आमदारांचे नेते बनले आहेत, जी पूर्वी शेकापच्या निवडून आलेल्या आमदारांची संख्या असायची. पवारांच्या नादी लागून ठाकरेंच्या पक्षाची देखील तशीच अवस्था झाली आहे!!
BJP has become old Congress like people movement
महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; मतांसाठी मविआचे नेते उलेमाचे तळवे चाटत आहेत
- Prithviraj Chavan पृथ्वीराज चव्हाण विधानसभेचे मटेरियल नाहीत; हवाओंका रूख बदल चुका है म्हणत फडणवीसांची टीका
- Dr. Archana Patil काहीच करायचे नाही असे मावळत्या आमदारांचे धोरण, डॉ. अर्चना पाटील यांचा अमित देशमुखांवर हल्लाबोल
- CM Shinde Speech कभी ठंड में ठिठुर कर देख लेना… कैसे की जाती है देश की हिफाजत मोदी से सिख लेना, शिवतीर्थावर मुख्यमंत्री शिंदेंचे भाषण