विशेष प्रतिनिधी
ठाणे : Eknath Shinde gaveएकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला आहे. मुख्यमंत्री कोणाला करायचं आहे त्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घ्यावा. ते जो निर्णय घेतली तो आपल्याला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. आपण अडीच वर्षाच्या कार्यकाळा जे काम केलं त्यासाठी समाधानी आहोत. आपल्याला अन्य कोणत्याही पदा पेक्षा सख्ख्या बहीणींचा सख्खा भाऊ हे पद सर्वात मोठे आहे असं त्यांनी सांगितलं. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. सरकार बनवताना, निर्णय घेताना माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षं तुम्ही राज्याचा विकास करण्याची, उद्योगधंदे आणण्याची संधी दिली आहे. तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुती, एनडीएचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे. तुम्ही निर्णय घेताना एकनाथ शिंदेंची अडचण आहे असं मनात आणू नका, मी अमित शाह यांनाही फोन करुन भावना सांगितल्या. जो काही निर्णय असेल तो मान्य असेल,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबद्दल जो काही निर्णय घेईल त्याला शिवसेनेचं पूर्ण समर्थन असेल. जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल असं सांगितलं आहे. कोणतीही कोंडी, नाराजी नाही आहे. येथे कोणताही स्पीडब्रेकर नाही. महाविकास आघाडीचा स्पीडब्रेकर आम्ही काढला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शाह जो काही निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.
विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रताप सरनाईक, नरेश म्हस्केही यावेळी उपस्थित होते. “इतक्या मोठ्या प्रमाणता विजय मिळाला हा मोठा आहे. गेल्या अनेक वर्षात इतका मोठा विजय पाहायला मिळालेला नाही. अडीच वर्षात महायुतीने केलेलं काम, लोकांनी दाखवलेला विश्वास याचं हे प्रतीक आहे. महाविकास आघाडीने रखडवलेली कामं, प्रकल्पं पुढे नेण्यात आली. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली. हा जनतेचा विजय आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. मी पहाटेपर्यंत काम करायचे, दोन तीन तास विश्रांतीनंतर पुन्हा सभा असायची. हे सत्र संपूर्ण निवडणुकीत चाललं. मी 80-10 सभा घेतल्या. पायाला भिंगरी लावून मी एक कार्यकर्ता म्हणून काम केलं. आज आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणारा आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितलं की, “मी स्व:तला मुख्यमंत्री न समजता सामान्य व्यक्ती म्हणून काम केलं. यामुळे मला कोणताही अडथळा येत नव्हता. सर्वसामान्यांसाठी महारा्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून काहीतरी केलं पाहिजे असं मी ठरवलं होतं. मी शेतकरी, सामान्य कुटुंबातून आलो आहे. कशाप्रकारे ते काटकसर करायचे हे मी पाहिलं होतं. त्याचवेळी मी संधी मिळाल्यानंतर असे लोक, लाडकी बहीण, ज्येष्ठ, शेतकरी अशा सगळ्यांसाठी काही ना का काही करायचं असं ठरवलं होतं. मला त्या वेदना समजत होत्या. महायुती सरकारच्या माध्यमातून मी सर्वांसाठी काम केलं.”