वृत्तसंस्था
मुंबई : Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात जाऊन ताबडतोब कार्यभार स्वीकारला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली पहिली सही एका कॅन्सर पेशंटसाठी पाच लाख रुपयांच्या मदतीवर केली.Devendra Fadnavis
पुण्यातील कॅन्सर पेशंट चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांच्या बोन मॅरो शस्त्रक्रियेची डॉक्टरांनी शिफारस केली आहे. त्यासाठी पाच लाख रुपयांची मदत शासनाने त्यांना मुख्यमंत्री आरोग्य निधीतून केली. त्यांच्या फॉर्मवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिली सही केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री यांच्या दालनात उपस्थित होते. फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यावर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
After taking oath as Maharashtra Chief Minister, Devendra Fadnavis, signed the to provide monetary assistance of Rs 5 lakh from the Chief Minister Medical Relief Fund to Pune patient Chandrakant Shankar Kurhade for bone marrow transplant treatment
(Source: CMO) pic.twitter.com/KqXwzYOoyh
— ANI (@ANI) December 5, 2024
त्यानंतर मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली, तर पहिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाऊन अभिवादन केले, त्याचबरोबर बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
Devendra Fadnavis takes charge of the Chief Minister’s office and signs the first Rs 500000 aid for cancer patients!!
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : महायुतीत मुख्यमंत्री कोण??, उपमुख्यमंत्री कोण??, ही तांत्रिक बाब; निर्णय सगळे एकत्रच; फडणवीसांच्या ग्वाहीने शिंदे खुश!!
- Devendra fadnavis : नो सरप्राईज, देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री; भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब!!
- GST collection : साबण आणि तेलासारख्या दैनंदिन वस्तूंमधून 75% GST कलेक्शन, अर्थ मंत्रालयाने लोकसभेत दिली माहिती