विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुमच्यात दम आहे का? आमच्यात दम आहे. एक नाही दोन सांभाळतोय, दोन्हींना तीन लेकरे आहेत, असे केलेले वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. बहुपत्नित्वाच्या मुद्द्यावरुन वकील गुणरत्न सदावर्तेंनी धस यांच्यावर निशाणा साधला आहे. धस यांच्यावर कारवाईची मागणी मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि भाजपा अध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी करणार असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले आहे.
बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी धाराशिव येथे मोर्चा काढण्यात आला . यावेळी जाहीर भाषणामध्ये धस म्हणाले की तुमच्यात दम आहे का? आमच्यात दम आहे. एक नाही दोन सांभाळतोय, दोन्हींना तीन लेकरे आहेत,’ आहेत. आपल्याला फोन पत्नी असल्याची कबुलीच धस यांनी दिली. यावरुन सदावर्तेंनी बहुपत्नित्वाच्या मुद्द्यावरुन धस यांच्यावर निशाणा साधला आहे.
सुरेश धस यांचा एकेरी उल्लेख करताना, “सुरेश धसला कशाप्रकारे दोन पत्नी असल्याचा बडेजाव किंवा प्रचार करण्याची मुभा 46 च्या कायद्यान्वये नाही. कारण लोकप्रतिनिधींसंदर्भात काही प्रतिबंधात्मक गोष्टी आहेत. लोकसेवत असलेल्या लोकांसंदर्भात अगदी जिल्हा परिषदेपासून वेगवेगळ्या स्तरावरील लोकांना हे नियम, कायदे लागू आहेत. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने बडेजाव केला ते कोणत्याही प्रकारे शील आचारसंहितेला एक वचनी, एक पत्नी प्रभू श्री रामचंद्राच्या विचारांना खीळ घातल्यासारखं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासकिय अधिकारी यांना दोन बायकांबरोबर एकाच वेळी लग्न करण्याचा अधिकार नाही. यावर प्रतिबंध घालणं गरजेचं असून या प्रकरणी आपण मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि भाजपा अध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी करणार असून धस यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहे.
धनंजय मुंडेंनाही पाच अपत्य आहेत. त्यांच्याविरोधातही तुम्ही कारवाईची मागणी करणार का? या प्रश्नावरही सदावर्तें म्हणाले, भारत निवडणूक आयोग, म्हणजे लोकसभा आणि विधानसभा लढवणाऱ्यांसाठी दोनपेक्षा जास्त अपत्यांच्या बाबतीत कोणताही प्रतिबंध घातलेला नाही. त्यांनी प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं असेल (पाच अपत्य), मला माहिती नाही. पण तुम्ही सांगताय म्हणून जर धनंजय मुंडेंनी तसं लिहिलं असेल तर ते सत्यच सांगत असतील ना. अपत्याच्या मुद्द्यावरुन अपात्र ठरण्याची शक्यता आता तरी दिसत नाही.
1946 चा कायदा हा बायकांच्या बाबतीत आहे. एक पत्नी असल्या संदर्भात आहे. तो कायदा अंमलात आणा, लागू करा असं माझं म्हणणं आहे. पत्नीसंदर्भात 1946 चा कायदा लागू होतो. धस हे लोकप्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधीने कसं वर्तन करावं, त्याची शील आचारसंहित काय असावी हे प्रभू श्रीरामचंद्र आणि सीतामातेंच्या काळापासून विश्वासिक नात्यांपासूनच दर्शवली गेली आहे. म्हणूनच एक वचनी, एक पत्नी आहे. मी कायद्यावर बोट ठेऊनच सांगत आहे. अपत्यांबाबतीत कोणताही कायदा केलेला नाही.
Gunaratna Sadavarte demand action on the Suresh Dhas over issue of polygamy
महत्वाच्या बातम्या
- Congress : नाना पटोले यांची होणार गच्छंती, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी ही नावे चर्चेत
- दोन शब्द सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख कुटुंबीयांबद्दल बोलले असते तर..सुप्रिया सुळे यांचा अमित शहा यांच्यावर पलटवार
- नास्तिक मेळाव्यात अभिनेते वैभव मांगले म्हणाले देवाचा पुजारी सर्वात नास्तिक..
- Senior SIT officials एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी देशमुख कुटुंबाची भेट घेणार; पोलीस अधीक्षक नवनीत कवत यांची माहिती