विशेष प्रतिनिधी
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मीक कराड याच्यामुळे आणखी एक पोलीस अधिकारी अडचणीत आला आहे. या दोघांतील फोन संवाद व्हायरल झाला आहे.
वाल्मीक कराड आणि बीड शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांचा ऑडिओ कॉल सध्या व्हायरल होतोय. या मोबाईल कॉल मध्ये गुन्हेगार सनी आठवले याच्यावर कारवाई करू नका. त्याला कशात गुतवू नका. तो सध्या माझ्याकडे कार्यरत नसला तरीही तो माझ्या भावासारखा आहे. सध्या स्थानिक राजकारणामुळे योगेश याचे जमत नाही म्हणून तो सध्या तिकडे गेला आहे. असा संवाद व्हायरल झाला आहे. सनी हा सराईत गुन्हेगार आहे.
आणि त्याच्या संबंधी वाल्मीक कराड आणि पोलीस निरीक्षक शितकुमार बल्लाळ यांच्यात थेट संवाद झाला असल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सदर क्लिप खोटी आहे. क्लिप मधील संवाद माझा नाही. सनी आठवले हा गुन्हेगार आहे. त्याचा भाऊ देखील गुन्हेगार आहे. सनी आठवले सध्या फरार असून यातील आवाज माझा नाही. याप्रकरणी मी गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी सांगितले आहे.
Another police officer in trouble due to Valmik Karad
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा कालच्या भाषणात रोख कोणाकडे होता? षडयंत्र कोणी रचले? छगन भुजबळ यांचा सवाल
- Donald Trump ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष; प्रत्येक धोक्यापासून अमेरिकन संविधानाचे रक्षण करण्याची घेतली शपथ
- Rahul Shewale : दुसऱ्या पक्षाच्या उदयापेक्षा स्वत:च्या पक्षाच्या अस्ताची चिंता करा, राहुल शेवाळे यांचा टोला
- कसला उदय होणार? तथ्यहीन बातम्या, अजित पवार यांनी फटकारले