विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : ज्येष्ठ साहित्यिक व माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर ( वय 87? यांचे शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास निधन झाले. चपळगावकर गेल्या काही महिन्यापासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे.
नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर यांचा जन्म १९३८ चा. वडील हैदराबाद स्वातंत्र्य चळवळीतील नेते होते. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक बारकावे माहीत असणाऱ्या चपळगावकरांनी राजकीय आणि वैचारिक लेखन केले. विधि आणि मराठी या विषयातील पदवी संपादन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात लातूरच्या दयानंद महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून तर नंतर छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद्र पहाडे विधि महाविद्यालयातही अध्यापनाचे काम केले. २८ वर्षे वकिली व्यावसाय केल्यानंतर १९ जानेवारी १९९० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची निवड झाली.
राजहंसचा ‘ श्री. ग. माजगावकर स्मृती ’ हा वैचारिक लेखनासाठी पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्कार ,महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेचा दिलीप चित्रे स्मृती पुरस्कार आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा राम शेवाळकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेल्या नरेंद्र चपळगावकर हे वर्धा येथील ९६ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
आपल्या लिखाणातून भारतीय स्वातंत्र्याचा काळ आणि नेतृत्व या विषयीचे त्यांचे चिंतन प्रेरणादायी मानले जाते. कविता, कथा लिखाणाने सुरुवात करणारे नरेंद्र चपळगावकर यांनी आपले वैचारिक लिखाण कधीही दुर्बोध होणार नाही, याची काळजी घेतली. त्यांची एकूण ३६ पुस्तके प्रकाशित झाली होती. यामध्ये तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या वरील चिरत्रात्मक लिखाण असणारे कर्मयोगी सन्यासी, भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा या क्षेत्रातील दीपमाळ यांचा समावेश आहे.
Narendra Chapalgaonkar passed away
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde स्वबळावर लढण्यासाठी मनगटात ताकद लागते, उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेंचा टोला
- Nana Patole : मद्य कंपन्यांशी करार करुन महाराष्ट्राला ‘दारुराष्ट्र’ करायचे आहे का ? नाना पटोले यांचा सवाल
- Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा कालच्या भाषणात रोख कोणाकडे होता? षडयंत्र कोणी रचले? छगन भुजबळ यांचा सवाल
- Amit Shah : सहकारासाठी, शेतकऱ्यांसाठी काय केले याचा हिशोब द्या, अमित शहा यांचे शरद पवारांना आव्हान