छगन भुजबळ भाजपमध्ये, म्हणाले उधरही ले चलो अपनी कस्ती जँहा तुफान आ गया है…’
विशेष प्रतिनिधी
पुणे : मंत्रिपद मिळाले नसल्याने नाराज असलेलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. भाजप जर फुले, शाहू, आंबेडकर यांचे काम करत आहे. ओबीसीसाठी काम करत आहे. मग मला त्यांच्यासोबत काम करण्यास अडचण नाही, असे स्पष्ट करताना @सुना है आज समुंदर में बडा गुमान आया है. उधरही ले चलो अपनी कस्ती जँहा तुफान आ गया है…’ असा शेर त्यांनी ऐकविले आहे.
पुण्यात एका प्रकट मुलाखतीत छगन भुजबळ यांना त्यांच्या पुढील वाटचालीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ‘सुना है आज समुंदर में बडा गुमान आया है. उधरही ले चलो अपनी कस्ती जँहा तुफान आ गया है…’ असा शेर सांगत ते म्हणाले, भाजप बरोबर काम करण्यात मला अडचण नाही. मंत्रालयात फुले यांची प्रतिमा लावणे असो की भिडे वाडा, फुले वाडा याबाबतचा प्रश्न मार्गी असो ते मार्गी लावण्यासाठी या सरकारने प्रयत्न केले. भाजपने अनेक ओबीसी नेत्यांना तिकीट दिले. मंत्रीपदे दिली. ६० टक्के ओबीसी भाजपसोबत आहे.
उद्धव ठाकरे यांच्याबाबत भुजबळ म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी कोरोना आला. त्यांनी दोन वर्ष चांगले काम केले. परंतु त्यांचा शारीरिक आजार हा त्यांना अडचणीचा होता. त्यामुळे त्यांना काम करणे अवघड होते. त्यांना मंत्रीपदाचा अनुभव नव्हता. पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केले.
बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे माझा छगन शरद घेऊन गेला. बाळासाहेबांचे शेवटपर्यंत माझ्यावर प्रेम होते. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या कडून मला खूप शिकायला मिळाले. शरद पवारांना का सोडले? त्यावर ते म्हणाले, मी त्यांना का सोडले ते विचारू नका. शरद पवार भाजपला आय लव्ह म्हणत होते. मात्र लग्न करायला तयार नव्हते. या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी आम्ही तरी कुठे लग्न केले आहे. आम्ही फक्त त्यांच्या बरोबर आहोत, अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली.
Chhagan Bhujbal in BJP, said Udharhi le chalo apni kasti janha tufan aa gaya hai…
महत्वाच्या बातम्या