विशेष प्रतिनिधी
पालघर : गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा भावानेच खून केल्याचे उघडकीस आली आहे. विल्हेवाट लावण्यासाठी दृश्यम स्टाईलने 40 फूट खोल खाणीत मृतदेह टाकण्यात आला .
गुजरातमधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल जिल्ह्यातील डहाणू विधानसभा परिसरातील शिवसेना शिंदे गट नेते अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आला. त्यांची गाडीही आढळून आली. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच काही साथीदारांसोबत घेऊन अशोक धोडी यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. २० जानेवारी रोजी बेपत्ता झाले होते. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ माजवली असून, पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मृत्यूचे कारण अपहरण आणि हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक
अशोक धोडी यांच्या गायब होण्याच्या १२ दिवसांनंतर पालघर पोलिसांनी गहन तपास सुरू केला. पोलिसांची आठ टीम घटनास्थळी सक्रिय होऊन चौकशी केली आणि त्याच वेळी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींनी हत्या करून मृतदेह कारसहित खाणीत फेकला असल्याची कबुली दिली. त्यांनी हा अपघात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.
सहकारी कुटुंबीयांची शंका आणि गूढ कारणे
तपासणीच्या दरम्यान एक धक्कादायक खुलासा झाला आहे. असे समजते की अशोक धोडी यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी मृतकाचे भाऊ किंवा जवळचे कुटुंबीय असू शकतात. त्यानुसार, या कुटुंबीयांनी त्यांच्याच भावा विरोधातील व्यक्तिगत वैरातून हा घात केला असावा, अशी शक्यता आहे.
Drushyam style murder of Shiv Sena leader Ashok Dhodi
महत्वाच्या बातम्या
- Nirmala Sitharaman’ : कॅन्सरवरील औषधे, टीव्ही, मोबाईल आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त
- Modi Govt : मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना आजपर्यंतची सर्वात मोठी भेट, एक लोक कोटी तोटा सहन करून १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- Devendra Fadnavis भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक
- नामदेव शास्त्री टीकेचीही तयारी ठेवा, मनसे नेते प्रकाश महाजन यांचा धनंजय मुंडे भेटीवरून इशारा