उद्याेग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती, डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचा नववा पदवी प्रदान साेहळा उत्साहात
पुणे : परदेशात राहणाऱ्यांना मराठी शिकविण्यासाठी अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे अभ्यासक्रम तयार करणार असल्याची माहिती उद्याेग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. शिक्षण संस्था चालकांची या प्रकारची सकारात्मक मानसिकता असेल तर सुसंस्कृत सुदृढ महाराष्ट्र घडण्यासाठी वेळ लागणार नाही, असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.
डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे आयाेजित नवव्या पदवीप्रदान समारंभाता प्रमुख पाहुणे म्हणून ते बाेलत हाेते. यावेळी विद्यापीठाचे अध्यक्ष डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील, कुलगुरू डाॅ. राकेश कुमार जैन उपस्थित हाेते. यावेळी उदय सामंत यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा मानद डाॅक्टरेट ( डी. लिट) देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रा. (डॉ.) निशाकांत ओझा (सायबर सुरक्षा, अंतराळ सुरक्षा, राष्ट्रीय संरक्षण, आणि आंतरराष्ट्रीय राजनैतिक धोरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी), डॉ. रचना बुक्सानी-मिरपुरी ( मानसिक आरोग्य आणि शिक्षण क्षेत्र), महाराज कुमार डॉ. लक्ष्यराज सिंग (सांस्कृतिक वारसा जतन, सामाजिक कल्याण, शिक्षण), अमित धमानी (जागतिक दागिने व्यापाराला नवी दिशा), नवाब शाजी उल मुल्क ( टी10 क्रिकेट लीगचे संस्थापक आणि शाश्वत वास्तुकलेचे प्रवर्तक) या मान्वरांना डी. लिट प्रदान करण्यात आली. त्याचबराेबर अभियांत्रिकी, डिझाइन, चित्रपट व माध्यम, कायदा, लिबरल आर्ट्स, हॉटेल व्यवस्थापन आणि वास्तुकला अशा विविध शाखांमधील 1,000 हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
उदय सामंत म्हणाले, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठात केवळ शिक्षण नव्हे तर संस्कार मिळत आहेत. ते आत्मसात करून विद्यार्थी देश घडविणार आहेत. यामध्ये अजिंक्य पाटील यांचे याेगदान माेठे आहे. पुण्यातील विश्व साहित्य संमेलनात महाराष्ट्राबाहेर राहणारे अनेक मराठी भेटले. त्यांनी खंत व्यक्त केली की आमची मुले माेठमाेठ्या शाळेत जातात. पण मातृभाषा मराठी बाेलताना त्यांना अडचण हाेते. यामुळे मी अजिंक्य पाटील यांना विनंती केली की तुमच्या विद्यापीठातर्फे असा अभ्यासक्रम तयार करू की परदेशात राहणाऱ्यांनाही मराठी शिकता येइल. परदेशी माणसांना मराठी शिकविण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे.
उदय सामंत म्हणाले, तुम्ही शिकून माेठे झाल्यावर तुमच्या हाताला राेजगार मिळावा यासाठी उद्याेग मंत्री या नात्याने दावाेसला जाऊन15 लाख 70 हजार काेटी रुपयांचे करार करून आलाे आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात हे ऐतिहासिक काम घडले. विद्यार्थ्यांना मला विनंती करायची आहे की ज्या क्षेत्रामध्ये काम कराल त्या क्षेत्राचे नावलाैकिक तुमच्यामुळे वाढेल. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जाेपासून सुदृढ महाराष्ट्र घडविण्यासाठी काम करावे.
परीक्षा रद्द करणार मंत्री अन् विद्यार्थ्यांसाठी देव!
उदय सामंत म्हणाले, काेराेनाच्या काळात मी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हाेताे. त्यावेळी परीक्षा घ्यायच्या की नाही असा प्रश्न निर्माण झाला. मी विद्यार्थ्यांना विचारले की परीक्षा व्हाव्यात की नकाे. नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी नकाे म्हणून सांगितले. त्यांची भावना तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सांगितली. जर साठ लाख विद्यार्थी , शिक्षक आणि कर्मचारी परीक्षेसाठी एकत्र आले तर काेराेनाचा बाॅंब आपण तयार करू, असे मांडले. तीन- चार वेळा सांगून बघितले. पण प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी मीच एके दिवशी महाराष्ट्रातील सर्व परीक्षा रद्द झाल्याचे जाहीर केले अन् मी अनेक विद्यार्थ्यांसाठी देव झालाे. संपूण महाराष्ट्रात परीक्षा रद्द करणारा मंत्री म्हणून माझी ओळख झाली. पण काेराेनाच्या धाेक्यात हा निर्णय मी घेतला हाेता.
डाॅक्टरेट मिळाल्यावर मंत्री उदय सामंत भावुक
डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे मानद डाॅक्टरेट प्रदान झाल्यावर मंत्री उदय सामंत भावुक झाले. ते म्हणाले. मी डाॅक्टर व्हावे अशी माझ्या आई – वडीलांची इच्छा हाेती.आजपासून माझ्याही नावासमाेर डाॅ. लागणार आहे. माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची नाेंद घेऊन डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांनी डाॅक्टरेट प्रदान करून माझा सन्मान केला.
डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील म्हणाले, नव्या तंत्रज्ञानाची आव्हाने स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार राहायला हवे. यासाठी तुम्हाला इनोव्हेटिव्ह विचार करावा लागेल. विविध प्रकारची कौशल्ये मिळवावी लागतील. एडीवायपीयू इनोव्हेशनचे हन बनत आहे. आज पदवी मिळाली असली तरी शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. विद्यापीठाच्या आवारात 600 बेडचे हॉस्पिटल उभारण्याचे काम सुरू आहे. लवकरच मेडिकल कॉलेज सुरू होणार आहे. माझे वडील डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रात खासगी शिक्षण संस्थांची मुहूर्तमेढ रोवली. खर्च परवडत नसल्याने वंचित राहणाऱ्या सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी संघर्ष केला. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून वाटचाल सुरू आहे.
कुलगुरू डाॅ. राकेश कुमार जैन यांनी यावेळी विद्यापीठात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठात मराठी भाषा केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची घाेषणा त्यांनी केली.
Ajinkya D. Y. Patil University offers courses to teach Marathi to those living abroad
महत्वाच्या बातम्या
- Nirmala Sitharaman’ : कॅन्सरवरील औषधे, टीव्ही, मोबाईल आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त
- Modi Govt : मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना आजपर्यंतची सर्वात मोठी भेट, एक लोक कोटी तोटा सहन करून १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- Devendra Fadnavis भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक
- नामदेव शास्त्री टीकेचीही तयारी ठेवा, मनसे नेते प्रकाश महाजन यांचा धनंजय मुंडे भेटीवरून इशारा