विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली खासगी कंपन्या, उद्योजकांना का मोकळीक दिली आहे. हजारो एकर जमिनी बाहेरच्या लोकांकडून खरेदी केल्या जात आहेत, यामुळे मराठी माणसाचे अस्तित्व संपण्याचा धोका आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. विश्व मराठी संमेलनात बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा आणि भूमिपुत्रांचा मुद्दा समोर आणला आहे.
मराठी भाषेच्या अस्तित्वाविषयी शंका व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले, काश्मीरमध्ये ३७० कलम काढल्यानंतर, बाहेरील लोकांना तेथे जमिनी घेता येतात. मात्र, आजही हिमाचल, आसाममध्ये इतर राज्यातील जमीन विकत घेऊ शकत नाही. जमिनी जाणार असतील, लोक बेघर होणार असतील, काही कामाचे नाही. ते अस्तित्व मिटवण्याचा प्रकार असतो. अशावेळी मराठी भाषिकांचे अस्तित्व टिकले नाही, तर मराठी भाषा कुठून टिकेल. त्यामुळे राज्य सरकारने मराठी माणसाचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
साहित्यिकांना विनंती आहे की, त्यांनी बोललं पाहिजे. त्यांनी आपली रोखठोक मते मांडायला हवीत. साहित्यिकांना केवळ पुस्तक लिहून चालणार नाही, तर मार्ग दाखवायला हवा. त्यांनी आपली भूमिका मांडायला हवीत. साहित्यिक बोलायला लागतील, तेव्हा लोक ऐकतील. त्यातून त्यांची पुस्तकेही अधिक वाचली जातील, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ अभिनेते सयाजी देशमुख म्हणाले की, मराठी घरात जन्म घेणे ही भाग्याची बाब आहे. जन्म घेतल्यावर पहिला शब्दही मराठीत कानावर पडतो. या मराठीमुळे आपली ओळख होते. मी हिंदी सिनेमात काम करीत असलो, तरी माझे स्वप्न मराठीत आहेत. मराठी माझ्या हृदयात आहे. त्यामुळे मराठीचे प्रेम कमी होणार नाही. हिंदी चित्रपटात काम करीत असलो तरी मराठी चित्रपट तयार करणे सोडणार नाही माझ्या प्रोडक्शन हाऊस ने गेल्या दहा वर्षात केवळ मराठी चित्रपटांची निर्मिती केली असून, यापुढेही सुरू राहील. विश्व मराठी संमेलनात रत्न पुरस्कार देऊन सन्मान केल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी असल्याचे देशमुख यांनी सांगितले. शिंदे यांनी त्यांच्यासोबत परदेशात घडलेला किस्सा सांगत, मराठी भाषेविषयी आपल्या सर्वांना प्रेम, आदर आणि अभिमान असायला हवे, असे स्पष्ट केले.
freedom to outsiders, purchase of thousands of acres of land, Raj Thackeray allegation
हत्वाच्या बातम्या
- Nirmala Sitharaman’ : कॅन्सरवरील औषधे, टीव्ही, मोबाईल आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त
- Modi Govt : मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना आजपर्यंतची सर्वात मोठी भेट, एक लोक कोटी तोटा सहन करून १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- Devendra Fadnavis भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक
- नामदेव शास्त्री टीकेचीही तयारी ठेवा, मनसे नेते प्रकाश महाजन यांचा धनंजय मुंडे भेटीवरून इशारा