विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आणि बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी बाबत धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांची भेट घेतली अशी चर्चा रंगली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही भेट करून आणल्याची म्हटले जात आहे. धस यांनी भेट झाल्याचे मान्य केले असले तरी त्यात बावनकुळे यांची मध्यस्थी नसल्याचे सांगितले आहे.
याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, आम्ही चार तास एकत्र होतो. सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे दोघेही होते. त्यांच्यात मतभेद आहेत मनभेद नाहीत. ते दूर होतील. आयुष्यात एक काळ असतो तो मतभेद दूर करतो. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, दोघेही मला भेटले. या दोघांत पारिवारिक भेट
मात्र, बावनकुळे यांनी भेट घडविल्याचा धस यांनी इन्कार केला. ते म्हणाले, मुंडेंना रात्रीच्यावेळी दवाखान्यात नेले होते. भरणे मामांनी नेले होते. का नेले होते ते विचारण्यासाठी गेलो होतो. चार तास भेट झाली असे कोण बोलले, त्यांना बाहेर येऊन मी काय काय केले हे तुम्ही पहा, आणखी चार दिवसांनी काय बोलणार आहे ते पहा,. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे न घेणे हे अजित पवारांच्या हातात आहे. माझा लढा हा हे लोक फाशीवर जाईपर्यंत सुरु राहणार आहे. मी स्वतः धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी गेलो होतो.
तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये मी त्यांच्या विरोधातच राहणार आहे, असे धस यांनी या भेटीवर स्पष्ट केले. याचबरोबर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
बावनकुळे यांच्यासोबत भेट झाली का, या प्रश्नावर बावनकुळे यांची माझी आता भेट होईल. बावनकुळे काय म्हणाले ते त्यांनाच बोला मला विचारू नका. मी परवाच गेलेलो. तब्येतीची चौकशी करणे यात गैर नाही. संतोष देशमुख हत्येचा लढा आणि चौकशी यात कोणताही संबंध नाही, असे धस यांनी सांगितले.
धस-मुंडे भेटीवर अंजली दमानिया म्हणाल्या, मला देखील चार-पाच दिवसांपूर्वी समजलेले. बावनकुळेंनी मध्यस्थी केल्याचे मला सांगितले गेले होते. अशी भेट झाली तर ती खूप दुर्दैवी आहे. धस आता मुंडेंविरोधात लढतील की नाही, काही खरे नाही. मला फार विचित्र वाटत आहे. ते आकाचा आका आहे असे बोलत होते. परंतू जे समोर येत आहे ते फार कठीण आहे, चुकीचे आहे, असे दमानिया म्हणाल्या आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा तुरुंगात आहे. याचा आका हे मुंडे असल्याचे आरोप धस यांनी केले होते. तसेच मुंडे यांच्या विरोधात सातत्याने धस यांनी आवाज उठविला होता. बीडमधील दहशतवाद मोडून काढण्याची भाषा धस यांनी केली होती. मुंडेंचा राजीनामाही त्यांनी मागितला होता. अशातच मुख्यमंत्री फडवीस यांचीही त्यांनी भेट घेतली होती. यानंतरही धस यांनी मुंडेंवर आरोप करणे सुरुच ठेवले होते. परंतू, आता या भेटीमुळे धस आणि मुंडे यांच्यात समेट झाल्याचेही म्हटले जात आहे.
Dhananjay Munde and Suresh Dhas reconciled, Dhas met, inquired about Mundes health..
महत्वाच्या बातम्या
- Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
- ”पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी अमेरिकेने रचला होता कट”
- Rupali Chakankar : रूपाली चाकणकर यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करणारे दोघे गजाआड
- Sharad Pawar : शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला, एकनाथ शिंदेंच्या सत्कारामुळे भडकले संजय राऊत