विशेष प्रतिनिधी
पुणे : Muralidhar Mohol पुण्यातील कोथरूड परिसरात मारणे टोळीकडून एका संगणक अभियंत्याला बेदम मारहाण झाली. यावरून केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना चांगलेच खडसावले आहे. हीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे असा सल्लाही त्यांनी दिला.Muralidhar Mohol
मोहोळ म्हणाले, दोन दिवसापूर्वी कोथरूड मध्ये जो हा सगळा प्रकार घडला आहे संगणक अभियान देवेंद्र जोग माझ्या ऑफिसला कामाला नाही. पण तो भाजप मध्ये काम करतो कोथरूड मध्ये त्याला त्याला मारहाण केली देवेंद्र असेल किंवा अजून कोणीही असो माझ्या शहरात अस झालं नाही पाहिजे पुण्यातील कुठल्याही भागात अस होत असेल तर ते चुकीचं आहे.
मोहोळ म्हणाले, काही जणांवर कारवाई झाली आहे. पण यांना कोणी वाचवायला येत असेल तर त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सोशल मीडियावर जे सुरू आहे त्याबाबत पुणे पोलिस डोळे झाकून बंद का आहेत ? जर पुण्यात पोलिसाला मारहाण होत असेल तर आम्ही पुणे पोलिस आयुक्तांना सांगतो अस चालू देणार नाही.
गृहमंत्री कमी पडत नाही. त्यांनी अनेकदा कारवाई केली आहे. पण आता पोलिसांनी गांभीर्याने घ्यायला हवे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोलापूरकर यांच्या वक्तव्यात प्रथमदर्शनी चुकीचे दिसत नाही असे म्हटले होते. यावरही मोहोळ यांनी पोलिसांना खडसावले आहे. ते म्हणाले, राहुल सोलापूरकर यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे त्यावर पुणे पोलिसांनी कर कारवाई करायला पाहिजे होती.
Union Minister of State Muralidhar Mohol reprimanded the Pune Police and advised them to introspect
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…