विशेष प्रतिनिधी
ठाणे : Jitendra Awad राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या डॉक्टरेटची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केली आहे. त्यांच्याकडे बनावट डॉक्टरेट पदवी आहे. त्यांचीआम्ही पोलिसांकडे चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आता युद्धाला सुरुवात झाली आहे. असा इशारा ही नजीब मुल्ला यांनी दिला.Jitendra Awad
दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश करणाऱ्या अभिजीत पवार यांनी गुरुवारी सायंकाळी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. या प्रवेशा प्रसंगी जितेंद्र आव्हाड आणि अभिजीत पवार यांनी अजित पवार तसेच नजीब मुल्ला यांच्यावर अनेक आरोप केले होते. बांधकाम व्यवसायिक परमार यांच्या हत्येचा उल्लेख करुन आणखी एक परमार घडवायचा आहे का, असा गंभीर आरोप आव्हाडांनी केला.
अजित पवार गटाचे नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. नजीब मुल्ला म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचे धमकावण्याचे काम आहे. त्यांनी अभिजित पवार यांच्या पत्नीला देखील धमकावले. बऱ्याच वर्षांपासून मी शांत होतो. खानदानी असल्याने आम्ही खालच्या स्तरावर जाऊन बोलत नाही. माझ्यावर आणि अजित पवार यांच्यावर आव्हाड यांनी खोटे आरोप केले. अभिजित पवार पक्षात येत होते. मात्र, माझा त्यांच्यावर विश्वास नव्हता. अभिजित पवार यांनी बेकायदेशीर रित्या पैसे कमावले आहेत. याबाबत चौकशी करावी, याकरिता आम्ही आयकर विभाग आणि सर्व एजन्सीला कारवाई करण्याचे पत्र देणार आहोत. अभिजित पवार यांनी कुठून पैसे कमावले त्याचे सर्व पुरावे आम्ही सादर करणार आहोत.
जितेंद्र आव्हाडांच्या डॉक्टरेटची चौकशी करणार
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या डॉक्टररेटची देखील चौकशी करावी. ती बनावट डॉक्टरेट आहे. त्याची चौकशी करावी. आम्ही पोलिसांकडे मागणी करणार आहे. असेही नजीब मुल्ला म्हणाले.
गुरुवारी जितेंद्र आव्हाडांनी उल्लेख केलेल्या सूरज परमार प्रकरणामध्ये कोणी पैसे घेतले? आणि बळी मात्र नजीब मुल्ला झाला. असा आरोपही मुल्ला यांनी यावेळी केला. केवळ जितेंद्र आव्हाड यांना वाचवण्यासाठी नजीब मुल्ला यांचा बळी गेला. मला खुनी म्हणत आहेत. पण आव्हाड यांच्या संदर्भात अनेक पुरावे माझाकडे आहेत, असा दावा ही मुल्ला यांनी केला.
माझ्याकडे अनधिकृतरित्या कमवलेले पैसे नाहीत. जितेंद्र आव्हाड यांनी बंगला कसा मिळवला? आता युद्धाची सुरुवात झाली आहे. आव्हाड यांच्या बाबतचे अनेक पुरावे बाहेर काढणार, असा इशारा मुल्ला यांनी दिला.
अभिजीत पवार पलटूराम आहेत. पुन्हा जितेंद्र आव्हाड कडे गेला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला.
Jitendra Awad’s doctorate fake, Najeeb Mulla’s demand to be investigated by the police
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…