आमच्यासह मस्साजोग गावकरी आंदोलनावर ठाम, धनंजय देशमुख यांचा इशारा

आमच्यासह मस्साजोग गावकरी आंदोलनावर ठाम, धनंजय देशमुख यांचा इशारा

Dhananjay Deshmukh

विशेष प्रतिनिधी

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले तरी आरोपींना शिक्षा झालेली नाही. फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्याची आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. आमच्यासह गावकरी आंदोलनावर ठाम असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले आहे.

देशमुख म्हणाले, स्थानिक पोलीस स्टेशनने सीआयडी कडे काय तपास दिला? तो योग्य आहे का..? सीआयडी चांगल्या दिशेने तपास करत आहेत. परंतु बेसिक तपास जो आहे तो समाधानकारक झालेला नाही. त्यावर आम्ही चर्चा केली. धक्कादायक माहिती अशी समोर आली की एस पी यांनी याबाबतची कुठलीही माहिती पुरवली गेली नव्हती.सहा डिसेंबर रोजी का ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला नाही.सगळे गुन्हे दाखल झाले ते वेळ निघून गेल्यावर झाले.

पोलिसांनी कृष्णा आंधळेला का आश्रय दिला होता. लोकांचे खून करण्यासाठी का?अपहरण करण्यासाठी त्याला पोलिसांनी मित्र बनवले होते का ? असा सवाल करत देशमुख म्हणाले, या सर्व प्रश्नांवर आजचे आंदोलन आहे .आम्ही आंदोलनावर ठाम आहोत गावकरी देखील आंदोलनावर ठाम आहेत. दोन दिवस हे अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार आहे. त्यानंतरही दखल घेतली नाही तर पाणी देखील घेणार नाहीत.

सीआयडी आणि एसआयटी तपास करत आहेत. ते कशा पद्धतीने काम करत आहेत ही माहिती आम्हाला नाही.केज पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना सांगायला हवं होतं की यापूर्वीच्या तपास कशा पद्धतीने झाला आहे. परंतु त्यांनी ते सांगितले नाही, असा आरोप त्यांनी केला.

मनोज जरांगे पाटील हेदेखील या ठिकाणी दुपारी येणार आहेत. या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. परंतु त्यांना आम्ही आंदोलनात सहभागी न होण्याची विनंती केली आहे. कारण त्यांची प्रकृती साथ देत नाही, असे देशमुख म्हणाले.

Dhananjay Munde दमानियांच्या आरोपांना धनंजय मुंडेंचे उत्तर, शासन कार्य नियमावलीनुसार GR काढल्याचा दावा

गावकऱ्यांच्या 7 प्रमुख मागण्या या आहेत.

1) केजचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि फौजदार राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करा.

2) फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा.

3) सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा.

4) संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा.

5) वाशी पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी घुले, दिलीप गित्ते, गोरख आणि दत्ता बिकड , हेड कॉन्सेटबल यांचे CDR तपासून त्यांना सहआरोपी करा.

6) आरोपींना फरार करण्यास मदत करणारे संभाजी वायबसे दांपत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांची चौकशी करून सहआरोपी करा.

7) घटना घडल्यानंतर संतोष देशमुखांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी PSI राजेश पाटलांनी तो कोणाच्या सांगण्यावरून कळंबच्या दिशेने वळवला याची चौकशी करा.

Dhananjay Deshmukh’s warning, stand firm on movement, massajog villagers with us

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023