विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमधे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.फलटणला गावी जाणाऱ्या तरुणीला शिवशाही बस फलटणला जाते, असे सांगून बसमध्ये जाण्यास सांगून तिच्यावर बलात्कार करण्यात आला .
दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, रा. शिक्रापूर) असे या नराधमाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. एक २६ वर्षाची तरुणी आपल्या गावी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली. तिला एकाने फलटणला जाणारी गाडी इकडे लागत नाही तिकडे लागते, असे सांगितले. त्यावर या तरुणीने इकडेच फलाटावर लागते, असे सांगितले.
त्यावर त्याने तिच्याशी गोड बोलून तिला मी १० वर्षे इथे आहे.
तिकडे लागणारी बसच फलटणला जाते, असे सांगून तिला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये अंधार होता. तेव्हा त्याने तुम्ही दरवाजा उघडून आत जा, असे सांगितले. तेव्हा ही तरुणी बसमध्ये गेली. तेव्हा तिच्या मागोमाग तो आत आला. त्याने दरवाजा लावून घेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर ही तरुणी फलटणला जाण्यास निघाली. अर्ध्या वाटेवरुन ती परत आली व तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात येऊन आपल्यावरील घडलेल्या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी तातडीने तेथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात आरोपी निष्पन्न झाला आहे.
Woman raped in Shivshahi bus at Swargate station
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…