विशेष प्रतिनिधी
जळगाव : Raksha Khadse केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची यात्रेत टवाळखोरांकडून छेडछाड झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वतः रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. Raksha Khadse
महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईनगर मध्ये आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते या यात्रेमध्ये फिरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या कृषीका ही यात्रेत गेली होती. यादरम्यान काही टवाळखोर मुलांनी तिचा पाठलाग केला आणि तिच्याबरोबर व्हिडिओ काढले. याबाबत शंका येतात सुरक्षारक्षकाने त्याच्या हातातील मोबाईल घेतला. परंतु सुरक्षा रक्षकाबरोबर त्यांनी अरेरावी केली. या आधी देखील याच मुलांनी रक्षा खडसे यांच्या मुलीचा पाठलाग केल्याचं लक्षात आलं म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आज गुन्हा नोंदवण्यासाठी मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या. Raksha Khadse
आदिशक्ती मुक्ताबाई ची यात्रा ही महाशिवरात्री निमित्त भरते या दिवशी कार्यक्रम असतो. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या कृषिका ही फराळ वाटप करत होती, यावेळी देखील भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर कृषीका काही यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणी बरोबर फिरायला गेली, यावेळी देखील हाच तरुण टवाळखोरांना घेऊन तिच्या पाठीमागे लागला. ते ज्या पाळण्यामध्ये बसत होती त्या पाळण्यामध्ये सुद्धा तो बसला. व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येतात त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु तो त्याच्या अंगावरती गेला.
या कारणास्तव मुलीच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या आज मुक्ताईनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत या तरुणांवर गुन्हा दाखल केला
रक्षा खडसे म्हणाल्या की आज एका मंत्र्याची खासदाराची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य मुलींचे काय? याबाबत मी मुख्यमंत्र्यांची ही चर्चा केली आहे.
खडसे म्हणाल्या, या लोकांना कोणाचे पाठबळ आहे हे माहिती नाही. आज माझ्या मुली सोबत हा प्रकार घडल्याने कळला. असे प्रकार कितीतरी मुलींबाबत होत असतील. त्याबाबत पुढच्या काळात लक्ष ठेवून राहणार आहे. या गोष्टी छोट्या वाटल्या तरी त्याबाबत बोलले पाहिजे. याबाबत बोलले नाही तर काहीही घडू शकते.
Raksha Khadse’s daughter molested by thugs during the Yatra
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…