विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या दोन वर्षांत परिवहन विभागाच्या 45 फेसलेस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. नुकताच राज्य शासनाने मेटासोबत व्हॉट्सअप गव्हर्नन्ससाठी करार केला आहे. यामुळे विविध विभागांच्या 500 अधिसूचित सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. आता यामध्ये परिवहन विभागाच्या 45 सेवांचादेखील समावेश करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशी माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी, मुंबई येथे आज परिवहन आयुक्त कार्यालय ‘परिवहन भवन’ इमारतीचे भूमिपूजन केले. तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळांतर्गत सन्मान निधी वितरण आणि परिवहन विभागातर्फे नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या फेसलेस सुविधांचे लोकार्पणही फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री मंगल प्रभात लोढा , आमदार मनिषा कायंदे, परिवहन विभागाचे संजय सेठी, विवेक भीमनवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, परिवहन विभाग सर्वात जास्त महसूल देण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. परिवहन विभाग थेट नागरिकांशी आणि अन्य विभागांशी समन्वय करावा लागतो यामुळे या विभागाचे काम कौतुकास्पद आहे. आपघातचे प्रमाण कमी करण्यासाठी खासगी वाहन चालकांशी आणि संस्थाशी समन्वय साधणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
45 services of the transport department will soon be available on WhatsApp, informed by Madhuri Misal
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…