विशेष प्रतिनिधी
अकोला : अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्याच्या नातीच अपहरण झाले आहे. अकोल्यातल्या कृषी नगर भागातल्या एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातून या 12 वर्षीय मुलीच अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिस ठाण्यात या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तातडीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असून, मुलीच्या शोधार्थ पोलिसांचे दोन पथक गठीत करण्यात आले असून, पथक मुलीच्या शोधात रवाना झालेत. अद्याप पर्यंत पाच ते सहा संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. अगदी गजबजलेल्या वस्तीतून आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास मुलीच अपहरण झाले आहे.
अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी सिव्हिल लाईन पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, संशयितांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत पाच ते सहा संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.
पोलीस अधीक्षक बच्चनसिंग आणि ठाणेदार जयवंत सातव यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत, मुलीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांना निर्देश दिले आहेत. शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून, घटनास्थळाचा बारकाईने आढावा घेतला जात आहे.
काही करा पण माझ्या नातीला शोधून द्या…. असा टाहो अपहरण झालेल्या मुलीच्या आजीने पोलीस स्टेशन परिसरात केला आहे.
Abduction of the relative of a former senior woman leader of Vanchit Bahujan Aghadi
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाप्रमाणे इतर विभागातील घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? नाना पटोले यांचा सवाल
- रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी चौघांना अटक, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते
- Jitendra Awhad जितेंद्र आव्हाड यांची बेड्या घालून येत विधिमंडळ परिसरात नौटंकी
- Sanjay Raut जसा नेता तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल