सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्यांना इन्फ्लूएन्सर कामिया जानीचं नाव काही नवं नाहीय. फूड व्लॉगर असलेली कामिया विविध ठिकाणांना भेटी देत असते. तिथली खाद्यसंस्कृती, चविष्ट पदार्थ आणि सोबत पाहुणेही असतात. या सगळ्याचे व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया पेजेसवर आपल्याला पाहायला मिळतील. पण असा एक व्हिडिओ ज्यामुळे ती वादात सापडलीय. कर्ली टेल्सच्या तिच्या पेजवरचा हा व्हिडिओ, तसा जगन्नाथ पुरीतला आहे. यात व्ही के पांडियन हे तिला मंदिराविषयी माहिती सांगत आहेत. याच व्हिडिओवर आक्षेप घेण्यात आला आहे.