भारतातल्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक म्हणजे पद्म पुरस्कार… हा पुरस्कार मिळवणं ही एक अभिमानाची बाब असते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा सन्मान मिळतो. पण पद्म पुरस्कार प्राप्त एखादी व्यक्ती तिचा पुरस्कार परत करण्याच्या मानसिकतेत असेल तर? आपल्या देशात आतापर्यंत अनेकांना पद्म पुरस्कार मिळालाय. त्यात ऑलिम्पिक पदकविजेता खेळाडू बजरंग पुनियाचाही समावेशय. पण त्यानं हा पुरस्कार परत करण्याची भावना व्यक् केलीय. पद्म सारखा सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक असलेला पुरस्कार परत करता येतो का? काय आहेत नियम?