विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुजरात समाचार बंद करण्याचा हा प्रयत्न म्हणजे केवळ एकाच वर्तमानपत्राचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न नाही तर लोकशाहीचाच आवाज बंद करण्याचा कट आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
गुजरातमध्ये ईडीने एका वृत्तपत्राच्या मालकाला ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपासून त्यांची सतत चौकशी तसेच कार्यालयांचा तपास सुरू होता. त्यानंतर ईडीने ‘गुजरात समाचार’चे मालक बाहुबली शाह यांना ताब्यात घेतले. या कारवाईवरून विरोधक राहुल गांधी यांनी यावरून सरकारवर टीका केली आहे.
बाहुबली शाह यांचा मोठा भाऊ आणि गुजरात समाचारचे व्यवस्थापकीय संपादक श्रेयांश शाह यांनी सांगितले की, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस त्यांच्या कार्यालयांचा तपास केला. गुरुवारी ईडीचे अधिकारी त्यांचा छोटा भाऊ बाहुबली शाह यांच्या नावाचे अटक वॉरंट घेऊन आले, आणि त्यांना सोबत घेऊन गेले.
यावर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर या संदर्भात एक पोस्ट केली आहे. ते म्हणतात, जेव्हा सत्तेतील लोकांना आरसा दाखवणाऱ्या वृत्तपत्रे बंद केली जातात, तेव्हाच समजून जावे की लोकशाही धोक्यात आली आहे. बाहुबली शाह यांची अटक ही याच भीतीतून झाली आहे. ही भीती हीच मोदी सरकारची ओळख बनली असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. देश लाठी-काठीने चालणार नाही आणि भीतीने देखील चालणार नाही. देश केवळ सत्य आणि संविधानावरच चालेल.
Rahul Gandhi alleges conspiracy to silence the voice of democracy, not Gujarat Samachar
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?