Rohit Pawar : संजय शिरसाट यांचा जमीन घाेटाळा, 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा राेहित पवार यांचा आराेप
Rohit Pawar : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यामागील शुक्लकाष्ठ संपायला तयार नाही. सिडकाेच्या जमीनीच्या व्यवहारावरून संजय शिरसाट पुन्हा वादात सापडलेत. सिडकोचे अध्यक्षपद मिळताच शिरसाट यांनी नियम धाब्यावर बसवून बिवलकर कुटुंबाला नवी मुंबईत 15 एकर जमीन दिली असून हा 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार असल्याचा आराेप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.











