विशेष प्रतिनिधी
पुणे : लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून व्यावसायिक केतन अग्रवाल याला दरीत ढकलून हत्या केल्याच्या बहुचर्चित प्रकरणात तपासाला वेग देण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. Siya Goyal
या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिची ‘पॉलीग्राफ (लाय डिटेक्टर)’ चाचणी करण्यासाठी पोलिसांनी पुणे न्यायालयात परवानगी मागितली आहे.
गुरुवारी न्यायालयात सादर केलेल्या अर्जात पोलिसांनी म्हटले आहे की, तपासादरम्यान आरोपींचे जबाब नोंदविण्यात आले असले तरी केतनला दरीत नेमके कुणी ढकलले, याबाबत कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार किंवा ठोस तांत्रिक पुरावा अद्याप हाती लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्य उघड करण्यासाठी आणि तपासाला योग्य दिशा मिळण्यासाठी पॉलीग्राफ चाचणी आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी सिया गोयल तसेच तिचा कथित प्रियकर आणि सहआरोपी चेतन चौधरी यांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, त्यांच्या जबाबांमध्ये विसंगती असण्याची शक्यता असल्याने या चाचणीद्वारे नवीन धागेदोरे मिळू शकतात, असा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
दरम्यान, कायद्यानुसार पॉलीग्राफ चाचणीचा अहवाल न्यायालयात थेट पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. मात्र, तपासाला गती देणे, संशयितांच्या जबाबांची पडताळणी करणे आणि लपलेली माहिती समोर आणण्यासाठी या चाचणीचा उपयोग केला जातो. आता पोलिसांच्या या अर्जावर न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Police Move Court for Siya Goyal’s Polygraph Test
महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या कार्यकाळात मोदी सरकारने नेमके केले काय?? आणि पुढे करणार काय??, वाचा तपशीलवार!!
- HSRP : HSRP नंबर प्लेट नसल्यास उद्यापासून थेट कारवाई; मुदतवाढ संपली, परिवहन मंत्र्यांचा इशारा
- सचिन अहिरविरोधात पत्रकारांसमोर फटकेबाजी; पण विधान परिषदेच्या उपसभापतींच्या निवडणुकीत माघारी!!; संदेश काय गेला??
- गडचिरोलीत माओवाद्यांविरोधात आणखी एक निर्णायक कारवाई; बालबेडा जंगलात शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून नष्ट!!