विशेष प्रतिनिधी
बंगळुरू :- नोकरी करणाऱ्या पालकांसाठी अत्यंत धक्कदायक आणि चिंता वाढवणारी बाब बंगळुरूमधून समोर आली आहे. एचएएल कॅम्पसमध्ये असलेल्या कॅपजेमिन या नामांकित आयटी कंपनीच्या डे-केअर सेंटरमध्ये २ वर्षाच्या निष्पाप लहान मुलांचा अमानुष छळ करण्यात आला आहे.अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल झाला असता या प्रकरणात पोलिसांकडून ५ महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकारानंतर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचा स्पष्ट होत आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.या व्हिडीओमध्ये चिमुरडीचा रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज ऐकू येत आहे. मुलांना घाबरवण्यासाठी आणि गप्प बसवण्यासाठी या महिला अत्यंत क्रूर पद्धतीचा वापर करताना आढळून आल्या .रडणाऱ्या मुलांना जबरदस्तीने वॉशिंग मशीनच्या ड्रममध्ये कोंडून ठेवले जात आहे. तसेच भीती दाखवण्यासाठी मुलांना वेस्टर्न टॉयलेट सीट वर बसवून त्यांच्या तोंडावर स्प्रे केले जात आहे. तर एक लहान मुलगी बाथरूममध्ये बंद असून ती ढसाढसा रडताना दिसत आहे.तर दुसरी महिला तिचा व्हिडीओ बनवुन तिला धमकावत आहे. मुले जमिनीवर पडून रडत असताना देखील या महिलांना त्यांची दया येत नसल्याचे दिसून येत आहे.
“या डे-केअर सेंटरमध्ये येणारे सर्व मुले कॅम्पसमध्ये काम करणाऱ्या आयटी प्रोफेशनल्सची आहेत. पालक कामावर असताना मुलांना येथे सोडून जायचे. मुलांसोबत झालेलं वर्तन अत्यंत गंभीर आणि वेदनादायी आहे.पोलीस सीसीटीव्ही आणि व्हिडीओची कसून चौकशी करत आहेत,” अशी माहिती पोलिसांनी दिली. यासोबत कर्नाटक राज्य बालहक्क संरक्षण आयोगानेही या घटनेची गंभीर दाखल घेतली आहे.
कंपनीने डे-केअर तात्पुरते बंद केले
हा धक्कदायक प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीने अधिकृत पत्र काढून घडलेल्या घटनेबद्दल माफी मागितली आहे.कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची आणि मुलांची सुरक्षा ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे असे सांगत कंपनीने डे-केअर तात्पुरते बंद केले आहे.या कंपनीचे मुख्य कार्यालय पॅरिस येथे आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीतच असा प्रकार घडल्याने आता पालकांमध्ये भीती वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
Inhumane abuse of innocent children at a Bengaluru day-care; case registered against 5 women
महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या कार्यकाळात मोदी सरकारने नेमके केले काय?? आणि पुढे करणार काय??, वाचा तपशीलवार!!
- HSRP : HSRP नंबर प्लेट नसल्यास उद्यापासून थेट कारवाई; मुदतवाढ संपली, परिवहन मंत्र्यांचा इशारा
- सचिन अहिरविरोधात पत्रकारांसमोर फटकेबाजी; पण विधान परिषदेच्या उपसभापतींच्या निवडणुकीत माघारी!!; संदेश काय गेला??
- गडचिरोलीत माओवाद्यांविरोधात आणखी एक निर्णायक कारवाई; बालबेडा जंगलात शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून नष्ट!!