विशेष प्रतिनिधी
पुणे: ऑनलाइन ऑर्डर करा आणि घरपोच बंदी घातलेले व्हॅप व हुक्का फ्लेव्हर्स मिळवा! पुण्यात अशाच एका धक्कादायक रॅकेटचा विमानतळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘पोर्टर’ अॅपचा वापर करून ई-सिगारेट (व्हॅप) आणि बंदी घातलेले हुक्का फ्लेव्हर्स ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
विमाननगरमधील सीसीडी चौकात पोलिसांनी सापळा रचून एका डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेच्या झडतीत विदेशी बनावटीच्या ई-सिगारेट, व्हॅप डिव्हाइस, हुक्का पॉट्स, बंदी घातलेले हुक्का फ्लेव्हर्स आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. पोलिसांनी ₹1 लाख 42 हजार 690 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त केला.
चौकशीत हा माल मोहम्मदवाडीतील ‘शिशा कॉर्नर’ या दुकानातून आणल्याचे उघड झाले. असद चांदमिया बरभैया आणि विकास रमेश बागुल यांनी ऑनलाइन ऑर्डरनुसार हा माल ‘पोर्टर’ अॅपद्वारे विमाननगरमधील ग्राहकाकडे पाठवल्याचा आरोप आहे. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात पुण्यातील उच्चभ्रू भाग आणि आयटी क्षेत्रातील तरुणांना ऑनलाइन माध्यमातून बंदी घातलेले व्हॅप आणि हुक्का फ्लेव्हर्स पुरवणारे मोठे जाळे सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
ही कारवाई विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक गाडे करत आहेत.
Porter App Used for Doorstep Vape Deliveries; Pune Police Bust Online Racket, Seize ₹1.42 Lakh Worth of Banned Goods
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : मुलांकडून गुन्हे करून घेणाऱ्यांवर माेक्का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- Chembur : चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड काेसळून १० विद्यार्थी गंभीर जखमी
- अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
- आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? आदित्य ठाकरे यांनी माेजून दाखविली सचिन अहिरांच्या घरातील पदांची यादी