विशेष प्रतिनिधी
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून मुंबई mumbai शहरातील दिवसाची सुरुवात सातत्याने पावसाने होत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग मंदावला असल्याचे दिसून येत आहे.अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र लोकल रेल्वे सेवा नियमितपणे सुरू आहे.आता भारतीय हवामान विभागाने अंधेरी, ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईतील अनेक भागांसाठी पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने बुधवार 1 जुलै रोजी मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे . शहरात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसही अशीच हवामानाची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. 1 जुलैसाठी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागरिकांना धोकादायक भागांपासून दूर राहण्याचा सल्ला
सततच्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं निदर्शनात येत आहे . त्यामुळे काही भागांमध्ये वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक ठिकाणी वाहनांचा वेग मंदावला आहे. पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंधेरी सबवे, मालाड, जोगेश्वरी, कुर्ला, मुलुंड आणि कांजूरमार्ग या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना धोकादायक भागांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला गेला आहे.
यंदा मुंबईत मान्सून नेहमीच्या तारखेपेक्षा 13 दिवस उशिरा दाखल झाला आहे . मात्र आता मान्सूनने धुमाकूळ घातला असून शहरातील जलाशयांमध्ये पाण्याची भर पडत आहे. ही बाब दिलासादायक असली तरी मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. सध्याच्या हवामान परिस्थितीचा विचार करता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये 5 ते 6 जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता दर्शवली आहे.
Four days of danger for Mumbai; heavy rain warning.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : मुलांकडून गुन्हे करून घेणाऱ्यांवर माेक्का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- Chembur : चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड काेसळून १० विद्यार्थी गंभीर जखमी
- अन्न व औषध प्रशासनाची पुणे विभागात धडक कारवाई; १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
- आम्ही रोज तुमच्या आरत्या करायच्या का? आदित्य ठाकरे यांनी माेजून दाखविली सचिन अहिरांच्या घरातील पदांची यादी