पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीच्या नमो घाटावरून तामिळ भाषिकांना त्यांच्या भाषेतून साद घातली. ही झाली बखरीली नोंद ! मात्र मोदींना थेट काशितून तामिळ भाषिकांना त्यांच्या भाषेतून साद घालण्याची गरज का भासावी? दक्षिणेतील राज्यांचा आणि तिथल्या भाषिक स्वाभिमानाचा दाखला दिला जातो.. तोच भाषिक स्वाभिमान जपण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमो घाटावरून केलं. त्यामागचा काय आहे प्लॅन? दक्षिण दिग्विजयाची ही नांदी तर नाही? गोमूत्र राज्य म्हणत उत्तर विरुद्ध दक्षिण अशी तेढ निर्माण करणाऱ्यांना मोदींनी दिलेलं हे उत्तर असू शकतं.