विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि मॉस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील १० जण आणि त्याच्या जवळचे ४ जण असा चौघांचा खात्मा झाला आहे. मसूद अजहरने स्वतः याची पृष्टी केली असून मी मेलो असतो तर बरे झाले असते असे म्हटले आहे.
पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानवर स्ट्राईक केला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांना भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले. त्यात बहावलपूर येथे असणाऱ्या जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयालाही टार्गेट करण्यात आले. याठिकाणी जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचं कुटुंब होते. या हल्ल्यात मसूदच्या कुटुंबातील १० जण आणि त्याच्या जवळच्या ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मसूद अजहरने या घटनेला पुष्टी केली आहे.या हल्ल्यानंतर मसूद अजहरने म्हटलं की, भारतीय हल्ल्यात माझ्या कुटुंबाचे १० सदस्य आणि ४ जवळचे सहकारी मारले गेले. या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते.
मौलाना मसूद अजहरच्या मोठ्या बहिणीसह मौलाना कशफ साहबचं पूर्ण कुटुंब, शहीद आणि मुफ्ती अब्दुल रऊफचे नातवंडे, बाजी सादियाचा पती आणि तिच्या मोठ्या मुलीचे ४ मुले जखमी झाले आहेत. या हल्ल्यात महिला आणि मुले मारली गेली असं जैश ए मोहम्मद संघटनेने माहिती दिली.
भारतीय सैन्य दलाने रात्री उशीरा ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले. त्यात जैश ए मोहम्मदचा गड असणाऱ्या पंजाबच्या बहावलपूर येथेही हल्ला करण्यात आला. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले.
मसूद अजहर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि मॉस्ट वाँटेड दहशतवादी आहे. मसूद भारतातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक आहे. मसूद अजहरला १९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्सचे विमान हायजॅक केल्याप्रकरणी अटक केले होते. त्यानंतर नागरिकांच्या सुटकेसाठी त्याला सोडण्यात आले. त्यानंतर तो पाकिस्तान लपून भारतात अनेक दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता. २००१ साली मसूद अजहरच्या नेतृत्वात जैश ए मोहम्मदने भारतीय संसदेवर हल्ला केला होता. २००० मध्ये जम्मू काश्मीर विधानसभा, २०१६ साली पठाणकोट एअरबेस आणि २०१९ साली पुलवामा दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग होता.
10 members of Jaish-e-Mohammed chief and most wanted terrorist Masood Azhar’s family killed
महत्वाच्या बातम्या
- Operation sindoor वर मोदींचे मॉनिटरिंग; जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले!!
- Operation sindoor : पाकिस्तानात 3 ठिकाणी 9 टार्गेटवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा घेतला बदला!!
- Devendra Fadnavis : अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Mahadev Jankar : भाजपने विचारले नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली, महादेव जानकारांची खंत