विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, काँग्रेसच्या काळात १५० खासदार हे सोव्हिएत युनियनचे एजंट म्हणून कार्यरत होते. त्यांना थेट सोव्हिएत युनियनकडून निधी मिळत होता. दुबे यांनी २०११ मध्ये सार्वजनिक झालेल्या सीआयएच्या एका गोपनीय दस्तऐवजाचा हवाला देत हा खळबळजनक दावा केला आहे. Soviet Union
एक्सवर पोस्ट करताना दुबे यांनी सांगितले की, हे प्रकरण तत्कालीन काँग्रेस नेते एच.के.एल. भगत यांच्या कार्यकाळातील आहे. सोव्हिएत रशियाने भारतातील काही पत्रकारांचा वापर करून आपले गुप्त हेतू साध्य केले. या अहवालात उल्लेख आहे की, सोव्हिएत एजंटांनी भारतीय माध्यमांमध्ये १६,००० लेख प्रकाशित करवले होते. याशिवाय सुमारे १,१०० रशियन गुप्तचर अधिकारी त्या काळात भारतात कार्यरत होते, जे नोकरशहा, राजकीय पक्ष, उद्योजक गट आणि मतप्रवर्तकांवर प्रभाव ठेवत होते.
दुबे यांनी आणखी एक गौप्यस्फोट करत सांगितले की, काँग्रेसच्या उमेदवार सुभद्रा जोशी यांना जर्मन सरकारकडून निवडणूक प्रचारासाठी ₹५ लाखांची आर्थिक मदत मिळाली होती. त्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्यानंतर, त्यांनी ‘इंडो-जर्मन फोरम’च्या अध्यक्षा पदाची जबाबदारी स्वीकारली.
दुबे यांनी आरोप करताना म्हटले की, “काँग्रेसने देशाच्या हिताऐवजी परकीय शक्तींची चाकरी केली आहे. जेव्हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, तेव्हा काँग्रेसची भूमिका संशयास्पद आणि राष्ट्रीय हिताच्या विरोधात राहिली आहे.”
सध्या काँग्रेसकडून या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, राजकीय वर्तुळात या प्रकरणामुळे खळबळ माजली आहे.
या मुद्द्यावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजप आणि काँग्रेस यांच्यात चांगलाच राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे.
150 Congress MPs were agents of the Soviet Union
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी