विशेष प्रतिनिधी
नरसिंहपूर (मध्यप्रदेश) : नरसिंहपूर जिल्ह्यातील उत्कृष्ठ शाळेत नुकतीच नियुक्त झालेल्या एका शिक्षिकेला माजी विद्यार्थ्याने पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुर्यांश कोचर (वय 18 वर्षे 6 महिने), हा शाळेचा माजी विद्यार्थी असून त्याला अटक करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचा संशय
सोमवारी दुपारी झालेल्या या हल्ल्यात 26 वर्षीय महिला शिक्षक गंभीर जखमी झाली असून तिच्या अंगावर सुमारे 25 टक्के भाजल्या आहेत. त्यांना तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी जबलपूर मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले आहे.
पोलिस उपअधीक्षक संदीप भुरिया यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीत या प्रकरणामागे “प्रेमसंबंध” हा मुद्दा असल्याचे समोर आले आहे. आरोपीवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.
सुर्यांश कोचर हा गेल्या वर्षी दहावी उत्तीर्ण झाला होता. पीडित महिला शिक्षकाला दीड महिन्यापूर्वी या शाळेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच अतिथी शिक्षक म्हणून नेमणूक देण्यात आली होती. शाळेचे प्राचार्य जी. एस. पटेल यांनी सांगितले की, “ही घटना अतिशय धक्कादायक असून शाळेतील सर्वजण हादरले आहेत.”
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्हा प्रशासनाने पीडितेच्या उपचाराचा पूर्ण खर्च उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. “दोघांच्या जबाबांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे पोलीस उपअधीक्षक भुरिया यांनी स्पष्ट केले.
18-year-old former student doused a 26-year-old female teacher
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला