विशेष प्रतिनिधी
बिजापूर : ‘नक्षलमुक्त भारत’ या संकल्पनेच्या दिशेने भारताने मोठे यश मिळवले आहे. छत्तीसगड व तेलंगणा सीमावरील कर्रेबुट्टलू डोंगर परिसरात झालेल्या इतिहासातील सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेत ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या मोहिमेतील यशाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दलांचे अभिनंदन केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, केवळ २१ दिवसांत पार पडलेल्या या ऑपरेशनमध्ये एकाही जवानाचा मृत्यू न होता ३१ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. कर्रेबुट्टलू डोंगर हा नक्षलवाद्यांसाठी PLGA बटालियन-१, DKSZC, TSC, व CRC यांसारख्या प्रमुख संघटनांचा गढ मानला जात होता. येथेच नक्षलवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. रणनीती आखली जात होती. त्याचबरोबर शस्त्रनिर्मिती केली जात होती.
बिजापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सीआरएफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग, छत्तीसगडचे पोलीस महासंचालक अरुण देव गौतम यांनी या ऑपरेशनची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, एप्रिल २१ ते मे ११, २०२५ या कालावधीत झालेल्या २१ चकमकींत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांचे मृतदेह व ३५ शस्त्रे हस्तगत केली आहेत. त्यात १६ महिला नक्षलवादी आहेत.
सध्या ओळख पटलेल्या २८ नक्षलवाद्यांवर एकूण १.७२ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते. मृतांमध्ये PLGA बटालियन, CRC कंपनी आणि तेलंगणा राज्य समितीशी संबंधित अनेक वरिष्ठ कमांडरचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सुकमा आणि बिजापूर या नक्षलग्रस्त भागांमध्ये गेल्या दोन वर्षांत सुरक्षा दलांनी अनेक नव्या छावण्या स्थापन करत वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे दबावाखाली आलेल्या नक्षलवाद्यांनी ६० किमी लांब व २० किमी रुंद अशा अवघड भूप्रदेश असलेल्या कर्रेबुट्टलू डोंगरात आश्रय घेतला होता. याठिकाणी सुमारे ३००-३५० सशस्त्र नक्षलवादी आधुनिक शस्त्रांसह उपस्थित होते.
केंद्रीय आणि राज्य गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयातून विशेष पथक तयार करण्यात आले. मानव आणि तांत्रिक गुप्त माहितीच्या आधारे तपशीलवार योजना आखून, वेळोवेळी फौजफाटा बदलत २१ एप्रिलपासून मोहीम सुरू करण्यात आली.
गृहमंत्री शहा यांनी म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचा आमचा निश्चय आहे. त्यांनी CRPF, DRG आणि STFच्या जवानांचे कौतुक करत म्हटले की, खराब हवामानात आणि अवघड डोंगराळ भागात या जवानांनी दाखवलेले शौर्य संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
A step towards ‘Naxal-free India’; 31 Naxalites killed in Karrebuttlu hills on Chhattisgarh-Telangana border
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?