Abu Saifullah संघाच्या मुख्यालयावर २००६ साली झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू सैफुल्लाचा पाकिस्तानमध्ये खात्मा

Abu Saifullah संघाच्या मुख्यालयावर २००६ साली झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू सैफुल्लाचा पाकिस्तानमध्ये खात्मा

Abu Saifullah

विशेष प्रतिनिधी

नागपूर : पहलगाम हल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले हाेते. त्यानंतरही पाकिस्तानात दहशतवाद्यांविराेधात कारवाई सुरूच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर २००६ साली झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड रजाउल्ला निजामनी खालिद उर्फ अबू सैफुल्ला याचा पाकिस्तानमध्ये खात्मा करण्यात आला आहे. नागपुरातील त्या हल्ल्याचा तब्बल १९ वर्षांनंतर बदला घेतला गेला आहे.Abu Saifullah

नागपूरच्या रेशीमबागेत २००६ च्या मे महिन्यात संघाच्या तृतीय वर्ष वर्गाला सुरुवात झाली होती. त्यानिमित्ताने संघाचे अनेक तत्कालीन पदाधिकारी नागपुरात होते. संघ कार्यकर्त्यांना घडविणारा वर्ग सुरू असतानाच हल्ला करण्याचा कट अबू सैफुल्लाने रचला होता. तत्कालीन सरसंघचालक के. सी. सुदर्शन व सरकार्यवाह डॉ. मोहन भागवत त्यावेळी मुख्यालयात नसले तरी इतर मोठे पदाधिकारी संघ मुख्यालयात होते. १ जून २००६ रोजी पहाटे चार वाजता तीन दहशतवादी लाल दिवा असलेली ॲम्बेसेडर गाडी घेऊन संघ मुख्यालयाकडे निघाले होते.Abu Saifullah



सुरक्षा यंत्रणेतील जवानांनी गाडीला थांबण्याचा इशारा केला होता. मात्र गाडी बॅरिकेड्स तोडून समोर निघाली होती. आत बसलेल्या तीनही दहशतवाद्यांजवळ एके ५६ पाहून नागपूर पोलीस व सुरक्षा यंत्रणांनी गाडीचा पाठलाग केला. तीन दहशतवादी चकमकीत ठारआरोपींनी गोळीबार केला व चकमकीत अफजल अहमद बट, बिलाल अहमद आणि मोहम्मद उस्मान हबीब हे तिघेही मारले गेले होते. नागपूर पोलिसांच्या या कारवाईचे मोठे कौतुक झाले होते व त्यांच्या तत्परतेमुळे संघ मुख्यालय वाचले होते.Abu Saifullah

नागपूरमध्ये झालेला तो पहिलाच मोठा दहशतवादी हल्ला होता. सैफुल्ला हा लष्कर-ए-तोएबाच्या अबू अनसचा उजवा हात होता. सैफुल्लाने संघ मुख्यालयावरील हल्ल्याचा कट रचला होता. त्याने तीनही दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन संघ मुख्यालयावर हल्ला करण्यासाठी पाठविले होते. दहशतवाद्यांकडून तीन एके ५६ रायफली, पाच किलो आरडीएक्स, १४ हँडग्रेनेड होते. कारमधून पोलिसांनी एक टिफिन बॉम्बदेखील जप्त केला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात दारूगोळा वापरून संघ मुख्यालय उडविण्याचेच टार्गेट घेऊन आरोपी आल्याचे स्पष्ट झाले होते.

सैफुल्ला रविवारी पाकिस्तानातील सिंध प्रांतातील बदीन येथे अज्ञात व्यक्तींच्या गोळीबारात ठार झाला. त्याचे मारेकरी कोण आहेत हे समोर आलेले नाही. मात्र मागील काही काळापासून जगातील विविध देशांमध्ये ‘अज्ञात’ व्यक्तींनी अनेक भारतविरोधी तत्त्वांचा खात्मा केला. त्यामुळे संघ वर्तुळातून सैफुल्लाच्या मृत्यूचे स्वागत होत असतानाच ते अज्ञात कोण याबाबत चर्चा रंगल्या होत्या. सैफुल्ला अनेक वर्षे नेपाळमधून ऑपरेट करत होता व काही काळापसून तो पाकिस्तानमध्येच दहशतवाद्यांच्या भरती व प्रशिक्षणाचे काम पाहत होता.

Abu Saifullah, the mastermind of the 2006 attack on the Sangh’s headquarters, was killed in Pakistan

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023