विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : पाकिस्तानच्या भूमीवर जोपर्यंत भारताविरोधात दहशतवादाला थारा दिला जातो, तोपर्यंत शांतता शक्य नाही. युद्धबंद, शस्त्रसंधी काहीही झाले असले तरी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशवाद्यांविरोधात कारवाई सुरुच राहिली पाहिजे, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लमिनचे (एआयएमआयएम) प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केली.
भारत आणि पाकिस्तान दरम्यान शनिवारी शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अवघ्या काही तासांत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचे वृत्त आले. ओवैसी यांनी शस्त्रसंधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, बाहेरच्या देशाकडून होणाऱ्या आक्रमणाविरोधात आमचा नेहमीच भारत सरकारला, आपल्या सैन्य दलांना पाठिंबा आहे. त्यासोबतच त्यांनी शस्त्रसंधी वरुन भारत सरकारला काही प्रश्नही विचारले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमच्या देशाचे प्रमुख आहेत. त्यांच्या ऐवजी एका परराष्ट्राच्या राष्ट्रप्रमुखाने शस्त्रसंधीची घोषणा कशी काय केली?
शिमला करारानंतर भारताने नेहमीच द्विराष्ट्रीय संबंधामध्ये तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाला नाकारले आहे. मात्र आता आपण तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप स्वीकारला आहे का? असा सवाल करत खासदार ओवैसी म्हणाले की, काश्मीर प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण होणार नाही. कारण हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ हे त्रयस्थ ठिकाणी सोमवारी दुपारी चर्चा करणार आहे. यावरही प्रश्न उपस्थित करत एमआयएम प्रमुख म्हणाले की, आपण त्रयस्थ ठिकाणी चर्चेचा प्रस्ताव का मान्य केला. या चर्चेचा अजेंडा काय असणार आहे? पाकिस्तान त्यांच्या भूमीवर आगामी काळात दहशतवादाला खतपाणी घालणार नाही, याची हमी देणार आहे का?
पाकिस्तानला भविष्यात दहशतवादी हल्ले करण्यापासून रोखण्याच्या आपल्या उद्देशात यशस्वी झालो आहो का? शस्त्रसंधीचा हा एकमेव उद्देश होता का? असे अनेक सवाल उपस्थित करत ओवैसी म्हणाले की, पाकिस्तानला एफएटीईच्या ग्रे यादीत टाकण्यासाठीची आपली आंतरराष्ट्रीय मोहीम यापुढेही सुरु राहिली पाहिजे.
Action against terrorists should continue, demands Asaduddin Owaisi
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित