अभिनेते-निर्माते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

अभिनेते-निर्माते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारत सरकारच्यावतीनं दिला जाणारा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 साठी मल्याळम सिनेसृष्टीतील अभिनेते , निर्माते, दिग्दर्शक मोहनलाल यांना जाहीर झाला आहे. मिथुन चक्रवर्ती, शंकर महादेवन, आशुतोष गोवारीकर या तिघांच्या दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीनं मोहनलाल यांच्या नावाची शिफारस केली.  Mohanlal

भारत सरकारच्यावतीने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पुरस्काराची घोषणा केली. 23 सप्टेंबर 2025 ला होणाऱ्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मोहनलाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. Mohanlal

मोहनलाल यांच्या भारतीय चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार घोषित करताना आनंद वाटत असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं. मोहनलाल यांचा चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांची अतुलनीय प्रतिभा, अष्टपैलुत्व आणि अथक परिश्रम यांनी भारतीय चित्रपट इतिहासात एक सुवर्ण मापदंड प्रस्थापित केला आहे, असं अश्विनी वैष्णव म्हणाले.



मोहनलाल विश्वनाथन नायर ख्यातनाम अभिनेते, निर्माते आणि पार्श्वगायक आहेत. “परिपूर्ण अभिनेते ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहनलाल यांनी पाच दशकांच्या कारकिर्दीत 360 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. किरीदम, भरतम, वानप्रस्थम, दृश्यम आणि इतर चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या आहेत.

मोहनलाल यांनी पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक केरळ राज्य चित्रपट पुरस्कारांसह भारत आणि परदेशात अनेक सन्मान मिळवले आहेत. 1999 साली प्रदर्शित झालेला त्यांचा ‘वानप्रस्थम’ हा चित्रपट कान चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला, ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.

मोहनलाल यांना 2009 साली भारतीय टेरिटोरियल आर्मीमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्त करण्यात आले. भारत सरकारने त्यांना 2001 साली पद्मश्री आणि 2019 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

Actor-producer Mohanlal to be conferred with Dadasaheb Phalke Award

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023