विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिला 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणात तीने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली असून, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चार्जशीटवरील कारवाई आता पुढे सुरूच राहणार आहे. Jacqueline Fernandez
हे प्रकरण कुख्यात ठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित आहे. त्याने विविध उच्चभ्रू व्यक्ती, उद्योगपती आणि सेलिब्रिटींना फसवून शेकडो कोटी रुपयांची लूट केली होती. या प्रकरणाशी संबंधित चौकशीत जॅकलिनचे नाव समोर आले.
जॅकलिनने दिल्लीतल्या हायकोर्टात एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, जुलै 3 रोजी हायकोर्टाने तिची मागणी नाकारून फक्त ट्रायल कोर्टालाच या प्रकरणातील तिच्या भूमिकेचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर जॅकलिनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र आज सुप्रीम कोर्टानेही तिची याचिका फेटाळून लावली. यामुळे आता तिच्यावर दाखल झालेल्या ED चार्जशीटवरील सुनावणी पुढे सुरू राहील.
ईडीच्या चार्जशीटनुसार, जॅकलिनने सुकेशकडून महागड्या भेटवस्तू, दागिने, घोडे आणि परदेशी दौर्यांचे खर्च घेतले होते. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, तिला सुकेशच्या गुन्हेगारी कारवायांची माहिती असूनही ती त्याच्याशी संपर्क ठेवत होती.
जॅकलिनने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, ती निष्पाप आहे आणि सुकेशच्या भूतकाळातील गुन्ह्यांविषयी तिला काहीच माहिती नव्हती. तिने न्यायालयात युक्तिवाद करताना तपास बंद करण्याची आणि तिच्या विरोधातील कार्यवाही रद्द करण्याची मागणी केली होती, परंतु ती फेटाळण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे जॅकलिनला आता ट्रायल कोर्टात आपली बाजू सविस्तर मांडावी लागणार आहे. प्रकरणात ईडीने आधीच पुरावे आणि साक्षीदारांची यादी दाखल केली असून, या खटल्याची सुनावणी आणखी गती घेणार आहे.
Actress Jacqueline Fernandez gets a big shock in the Supreme Court
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!




















