विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditya Thackeray मुंबईतील मिठी नदीचे गाळ काढण्याच्या (डेसिल्टिंग) कामामध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) चौकशी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे जिवलग मित्र असलेल्या बॉलिवूड अभिनेता दिनो मारियाची या घोटाळा प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.Aditya Thackeray
या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यात पाच कंत्राटदार, तीन दलाल, विविध कंपन्यांचे संचालक, तसेच महापालिकेचे विद्यमान आणि माजी अधिकारी यांचा समावेश आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे. या प्रकरणात बनावट दस्तऐवज, खोट्या करारनाम्यांचा वापर, आणि यंत्रसामग्रीच्या भाड्याच्या दरात फुगवटा यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे.
मार्च 2025 मध्ये EOW ने स्पेशल इन्स्पेक्शन टीम (SIT) स्थापन करून प्रभावित 13 जणांविरुद्ध FIR नोंदवली. त्यात पाच कंत्राटदार, तीन दलाल, दोन कंपन्यांचे संचालक आणि तीन बीएमसी अधिकारी या प्रमुखांचा समावेश आहे. 2013 ते 2023 दरम्यान अनेक तांत्रिक माहिती खोट्या MoU मध्ये नमूद करून, वास्तविक काम न करता घोटाळा रचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.
डिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. दोघेही मुंबईतील सार्वजनिक उपक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत, डिनो मोरियाने सुरू केलेल्या ओपन-एअर फिटनेस स्टेशनच्या उद्घाटनास आदित्य ठाकरे उपस्थित होते. या मैत्रीवर काही वादग्रस्त आरोपही झाले आहेत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात, दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरे आणि डिनो मोरियावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला की, दिशा सालियनच्या मृत्यूच्या रात्री आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आणि इतर काहीजण तिच्या घरी उपस्थित होते आणि त्या घटनेत त्यांचा सहभाग होता. या आरोपांमध्ये ड्रग्ज व्यवसायाशी संबंधित दावेही करण्यात आले आहेत. या आरोपांची अधिकृत तपासणी सुरू असून, अद्याप कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही.
Aditya Thackeray’s close friend questioned in Mithi river silt scam
महत्वाच्या बातम्या
- Economy : अर्थव्यवस्थेत भारताने जपानला टाकलं मागे, आता जर्मनीची वेळ
- Jyoti Malhotras : ज्योती मल्होत्राच्या फोनवरून मोठा खुलासा, पाकिस्तानी युट्यूबरसोबत करत होती काम!
- Lalu Prasad Yadav : बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी मोठी कारवाई
- Mysore Pak : आता ‘म्हैसूरपाक’ नाही ‘म्हैसूर श्री’ म्हणायचं