विशेष प्रतिनिधी
काबूल / इस्लामाबाद : ऑपरेशन सिंदूर नंतर भारतापुढे युद्धबंदीची याचना करणारा पाकिस्तान आता अफगाण तालिबानसमोरही नतमस्तक झाला आहे. बुधवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानावर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर परिस्थिती बिघडली, मात्र शेवटी युद्धबंदीची विनंती पाकिस्तानलाच करावी लागली. भारताकडून मिळालेल्या धड्यांनंतर पाकिस्तान आता तालिबानकडूनही ‘पाठ’ शिकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. Afghan Airstrikes
अफगाण माध्यमांच्या मते, पाकिस्तानी लढाऊ विमानांनी काबूल आणि स्पिन बोल्दाक भागात बॉम्बहल्ले केले, ज्यात डझनभर लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. प्रत्युत्तरादाखल अफगाण सैन्याने पेशावरमधील एका प्लाझावर ड्रोन हल्ला केला, जिथे गुप्तचर कारवायांसाठी कार्यालय चालवले जात असल्याचा दावा करण्यात आला.
यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला, परंतु पाकिस्तानच्या विनंतीवरून ४८ तासांची युद्धबंदी लागू करण्यात आली.
ही युद्धबंदी बुधवारी भारतीय वेळेनुसार सायं. ६.३० वाजता लागू झाली.
तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी जाहीर केले की, “दुसऱ्या बाजूने उल्लंघन होत नाही तोपर्यंत अफगाण सैन्याने युद्धबंदीचे काटेकोर पालन करावे. ही युद्धबंदी पाकिस्तानच्या विनंतीवर लागू करण्यात आली आहे.”
अफगाण माध्यम टोलो न्यूजच्या मते, पाकिस्तानने सुरुवातीला दीर्घकालीन युद्धबंदीला मान्यता दिली होती, पण नंतर मागे हटून फक्त ४८ तासांची मर्यादित युद्धबंदी जाहीर केली. अफगाण सूत्रांनी या निर्णयाला “करारभंग” म्हटले आहे.
पाकिस्तानी माध्यमांनुसार, लष्कराने कंधार प्रांतातील तालिबानच्या चौथ्या बटालियन आणि सहाव्या बॉर्डर ब्रिगेडचा नाश केला असल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानचे लष्करी प्रवक्ते म्हणाले – “आम्ही तालिबानच्या हल्ल्यांना ठिकाणांवर प्रत्युत्तर देत त्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. आमचे सैन्य कोणत्याही हल्ल्याला तितक्याच जोरात प्रत्युत्तर देईल.”मात्र, तालिबानने हे दावे फेटाळले असून अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
या संघर्षाचे मूळ कारण तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी गटावरून निर्माण झालेला वाद आहे. गेल्या आठवड्यापासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष पेटला असून, सीमेवरील सुरक्षा परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे.
After India, Pakistan Bows Before the Taliban! Pakistan Pleads for Ceasefire Following Afghan Airstrikes
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा