विशेष प्रतिनिधी
पाटणा: निवडणुकीतील कथित मतचोरीच्या ‘अणुबॉम्ब’ नंतर आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ आम्ही टाकणार आहोत. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींना तोंड लपवायला जागा उरणार नाही, असा इशारा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दीला. Rahul Gandhi
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी काढलेल्या मतदार अधिकार यात्रेचा सोमवारी राजधानी पाटण्यात समारोप झाला. यावेळी कथित मतचोरीच्या आरोपांचा विरोधकांनी पुनरुच्चार केला. मतचोरीचा अर्थ अधिकार, आरक्षण, रोजगार, शिक्षण आणि युवकांच्या भवितव्याची चोरी करणे आहे. मतचोरीनंतर लोकांचे रेशन कार्ड, जमीन हिसकावून घेतली जाईल व अदानी व अंबानी यांना दिली जाईल. मात्र आम्ही त्यांना संविधानाची हत्या करूदेणार नाही, असे राहुल गांधींनी सांगितले.
.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरी करून भाजपने सत्ता हस्तगत केल्याचा आरोप त्यांनी पुन्हा केला. आता भाजपच्या लोकांनी तयार राहावे. कारण आमचा हायड्रोजन बॉम्ब येत आहे. तुमची मतचोरी संपूर्ण देशाला कळणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे भाजपवर जोरदार हल्ला चढविताना म्हणाले, ज्या शक्तींनी महात्मा गांधीजींची हत्या केली. आता त्याच शक्ती संविधानाची हत्या करीत आहेत. मात्र, आम्ही त्यांचा प्रयत्न हाणून पाडणार असल्याचे त्यांनी ठणकावले. मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या झोळीत जाऊन पडले आहेत. त्यांनी समाजवादी विचारसरणीशी तडजोड केली. मात्र एकेदिवशी हेच भाजप संघवाले त्यांना यांना कचराकुंडीत फेकतील.
आगामी बिहार निवडणुकीनंतर ‘डबल इंजिन’ सरकार असणार नाही. याउलट महाआघाडीचे गरीब, महिला, दलित आणि मागासवर्गीयांचे सरकार बनेल, असा दावा त्यांनी केला. भाजपने आमची मतदार अधिकार यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु राहुल गांधी, तेजस्वी यादव व महाघाडीचे नेते कुठेही थांबले नाहीत. अखेर आमची मतदार यात्रा पूर्ण झाली. नरेंद्र मोदी बिहारमध्ये मतचोरी करून निवडणूक जिंकू पाहत आहेत. मात्र, आपल्याला सतर्क राहावे लागणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जनतेला मतदानाचा अधिकार दिला. आम्ही हा अधिकार कदापि गमावू देणार नाही, असे खरगे म्हणाले.
नितीश कुमार एकेकाळी समाजवादाची भाषा करीत होते. संपूर्ण देशभरात फिरून राम मनोहर लोहिया व जॉर्ज फर्नाडिस यांचे गुण गात होते. मात्र आता ते भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या झोळीत जाऊन पडले आहेत. एकेदिवशी भाजप व संघाचे लोक नितीश कुमार यांना कचराकुंडीत फेकून टाक तील, असे टीकास्त्र खरगे यांनी सोडले.
मतचोरीबाबत बिहारच्या जनतेने सतर्क राहावे अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह तुम्हाला एकेदिवशी बुडवून टाकतील, असा इशारा खरगेंनी दिला.
बिहारमधील एका अभियंत्याच्या घरी कोट्यवधी रुपयांची रोकड आढळल्याचा उल्लेख करीत नितीश कुमार हे नैतिक भ्रष्टाचाराचे भीष्म पितामह व डुप्लिकेट मुख्यमंत्री आहेत, असा आरोप बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केला.
माझे पिता लालूप्रसाद यादव कधीच भाजपपुढे झुकले नाही. त्यांच्याप्रमाणेच आम्हीसुद्धा झुकणार नसल्याचे त्यांनी ठणकावले. बिहारची धरती लोकशाहीची जननी आहे. भाजपचे दोन नेते (मोदी-शाह) निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करीत लोकशाही संपुष्टात आणू पाहत आहेत. आता देशात लोकशाही पाहिजे की राजेशाही? याचा फैसला जनतेने करावा, असे आवाहन तेजस्वी यादवांनी केले.
After the ‘atomic bomb’ of vote theft, we will now drop a ‘hydrogen bomb’, warns Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल